चाळीसगावच्या दोन पोलिसांना चार हजाराची लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 23:40 IST2022-06-28T23:40:37+5:302022-06-28T23:40:54+5:30
सहाय्यक फौजदार अनिल अहिरे आणि पोकॉ. शैलेंद्र पाटील अशी या पोलिसांची नावे आहेत.

चाळीसगावच्या दोन पोलिसांना चार हजाराची लाच घेताना अटक
चाळीसगाव जि.जळगाव : चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यातील दोन कर्मचार्यास चार हजारांची लाच घेताना जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सिग्नल चौकात ही कारवाई करण्यात आली.
सहाय्यक फौजदार अनिल अहिरे आणि पोकॉ. शैलेंद्र पाटील अशी या पोलिसांची नावे आहेत. तक्रारदार यांच्या मुलीचा छळ केल्याबाबत चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासह चार्जशीट पाठवण्यासाठी पाच हजारांची लाच या दोन पोलिसांनी मागितली होती. चार हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रार करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजोग बच्छाव, निरीक्षक एन.एन.जाधव व कर्मचार्यांनी ही कामगिरी बजावली.