शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोनजणांचा जागीच मृत्यू तर दोनजण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 21:15 IST

Accident case : दर्यापूर रोडवर सिरसो फाट्या पुढे असलेल्या शिव मंदिराजवळ दोन दुचाकीची जोरदार धडक झाली.

मूर्तिजापूर (जि. अकोला) : दुचाकीची समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात २ जण ठार व २ जण जखमी झाल्याची घटना दुपारी ३ वाजताच्या दरम्यान दर्यापूर रोडवरील सिरसो परिसरातील शिवमंदिरा जवळ २२ जुलै रोजी घडली.

दर्यापूर रोडवर सिरसो फाट्या पुढे असलेल्या शिव मंदिराजवळ दोन दुचाकीची जोरदार धडक झाली. या धडकेत दोन जण ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. ४ वर्षीय मुलगा व १२ वर्षाच्या भाची व ४ वर्षाच्या मुलासह सोबत दुचाकीवर माना ता. मूर्तिजापूर येथिल मो. रिझवानद्दीन मो. सैफुद्दीन (३२) हे दर्यापूरकडे आपल्या एम एच ३० बी के ४९९६ ने जात असताना समोरुन येणाऱ्या एम एच २७ एबी ९९२४ या दोन दुचाकीत समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दोन जण ठार झाले. माना येथील मो. रिझवानद्दीन मो. सैफुद्दीन (३२) घटनास्थळीच ठार झाले. तर भाची अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले होते परंतु तिचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 

दोन्ही दुचाकीची समोरासमोर झालेला जबर धडक मध्ये रियाजोदीन सैफुदिन वय ३२ राहणार माना हा जागीच ठार झाला तर त्याची भाची १२ वर्षाची व ४ वर्षाचा मुलगा जखमी झाला तर दुसऱ्या दुचाकी वरील योगेश जगन्नाथ गावंडे राहणार उमरी योगी (महाराज) दर्यापूर हा गंभीररीत्या जखमी झाल्याने सर्वांना स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतु परिस्थिती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे हेड पोलिस कॉन्स्टेबल विनोद राठोड एन पी सी राजेश्वर सोनोने हे घटनास्थळी रवाना होउन जखमींना रूग्णालयात दाखल केले.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू