शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांवर दोन हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 21:30 IST

शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या चिटणीसावर हल्ला; संघटनांचे वाद मुंबईच्या रस्त्यावर

ठळक मुद्देविशेषत: शिवसेनेच्याच महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेना यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे.याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गाडीच्या डावा बाजूच्या खिडकीच्या समोरील काच फोडण्यात आल्या.

मुंबई - विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवसेनेचे पदाधिकारी चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच शिवसेनेच्या आणखी एका पदाधिकाऱ्यावर पवई येथे हल्ला झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जीवन कामत असं हल्ला केलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याचे नाव आहे.

जीवन कामत हे शिवसेनेचे गोवा संपर्कप्रमुख व भारतीय कामगार सेनेचे चिटणीस असून कामत यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. विशेषत: शिवसेनेच्याच महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेना यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय कामगार सेनेचे चिटणीस जीवन कामत यांच्यावर गुरुवारी माथाडी कामगार सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हल्ला केला. जीवन कामत यांनी पवई पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे. संशयित आरोपींची माहितीही पोलिसांना दिल्याचे सांगितले. दरम्यान, या हल्ल्यात कामत यांच्या चालकालाही मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून संघटनेमध्ये वाद सुरू होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय कामगार सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत माथाडी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन बैठकाही केल्या होत्या. त्यातून सलोख्याने हा वाद मिटवण्याबाबत चर्चा झाल्या होत्या. मात्र, माथाडी कामगारांमधील या वादातून धुसफुस सुरूच होती. त्यातून हा वाद इतका पेटला की गुरुवारी थेट माथाडी कार्यकर्त्यांनी कामत यांच्यावर हल्ला केल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी दुपारी पवईतील रेनायसन्स हॉटेलजवळ गावात हा हल्ला करण्यात आला. गाडी पळवल्यामुळे ते बचावले. दरम्यान, हल्ल्यात कामत यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. गाडीच्या डावा बाजूच्या खिडकीच्या समोरील काच फोडण्यात आल्या. सुदैवाने त्यात कामत बचावले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliceपोलिसFiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारी