शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

व्यापाऱ्याची दोन लाखांची बॅग लांबविणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 17:31 IST

Crime News : मदतीचा बहाणा : आणखी एक संशयित फरार

ठळक मुद्देबॅग लांबविणाऱ्या विशाल उर्फ नाना संजय तेली (वय २३) सागर संजय पाटील (वय २०) दोन्ही रा. पिंपळगाव हरेश्र्वर, ता.पाचोरा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली.

जळगाव : मालवाहू वाहनाचे टायर पंक्चर झाल्यानंतर तेथे मदतीचा बहाणा करून व्यापाऱ्याची २ लाख ६ हजार रुपये रोकड असलेली बॅग लांबविणाऱ्या विशाल उर्फ नाना संजय तेली (वय २३) सागर संजय पाटील (वय २०) दोन्ही रा. पिंपळगाव हरेश्र्वर, ता.पाचोरा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून २० हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आलेली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सातगाव डोंगरी, ता.पाचोरा येथील भिकन आनंदा पाटील (४५) हे शेतकरी व भूईमंग शेंगा खरेदी विक्रीचे व्यापारी आहेत. व्यापारामध्ये अस्लम नवाब फकीर हे त्यांचे भागीदार आहेत. १० मे रोजी परिसरातून ४१ क्विंटल ९० किलो भुईमुगाच्या शेंगा घेऊन ते मालवाहू वाहनाने ( क्र.एम.एच.०५ एस. २६९९) धुळ्याला गेले. तेथे या शेंगा विक्री केल्यानंतर त्याचे २ लाख ६ हजार ६९९ रुपये घेऊन परत याच वाहनाने सातगाव येथे येत असताना भडगाव येथे पाचोरा रस्त्यावर शासकीय आयटीआय जवळ रात्री ११.३० वाजता वाहन पंक्चर झाले‌. वाहन रस्त्याला बाजूला लावून चालक पंक्चर काढत असताना मागून दुचाकीवरून तीन जण आले. रस्त्याच्या बाजूला लागलेले वाहन पाहून त्यांनी पुढे जाऊन दुचाकी मागे वळवली. पाटील यांना आम्ही तुमची मदत करतो असे सांगून पंक्चर काढण्यासाठी एकाने चाक बदलण्यासाठी मदत करायला सुरुवात केली. यावेळी दुसराही मदत करायला लागला.काही क्षणातच   दोघांनी नजर चुकून गाडीतील बॅग काढून पुढे गेले. त्यांच्यामागे तिसरा दुचाकी घेऊन गेला. पुढे तिघे जण बॅग घेऊन पसार झाले. थोड्या वेळाने पाटील यांनी गाडीत बॅग आहे की नाही याची खात्री केली असता बॅग गायब होती. दुचाकीस्वारांवर संशय आल्याने पाटील यांनी भडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

चालकच निघाला फुटीरया प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर भडगाव पोलिसांनी चालक विशाल तेली याच्यावर संशय व्यक्त करून तीन, चार वेळा त्याची चौकशी केली. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. चालक, व्यापारी व त्यांचा भागीदार या तिघांची पार्श्वभूमी तपासली. तसेच या गुन्ह्याच्या तपासासाठी सहायक फौजदार अशोक महाजन, शरीफ काझी, युनुस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजित जाधव, राजेंद्र पवार यांचे स्वतंत्र पथक नियुक्त केले. या पथकाने सर्वात आधी चालकाला ताब्यात घेतले. काही गुप्त माहिती व पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर चालकाने गुन्ह्याची कबुली दिली. सोबत असलेल्या सागर व शाहरुख यांचे नावे सांगितली. त्यानुसार सागरला ताब्यात घेण्यात आले. तिसरा शाहरुख तडवी ( पाचोरा) हा फरार झाला. अटकेतील दोघांनी २० हजारांची रोकड काढून दिली. उर्वरित रकमेत तिघांनी मौजमजा केली.

टॅग्स :ArrestअटकJalgaonजळगावPoliceपोलिस