दुर्मिळ हस्तीदंताची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 17:50 IST2019-04-05T17:50:13+5:302019-04-05T17:50:40+5:30
याबाबत कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दुर्मिळ हस्तीदंताची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
ठाणे - ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिट ५ ने कारवाई करत दुर्मिळ हस्तीदंताची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. याबाबत कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वन्यजीव सरंक्षण अधिनियम १९७२ कलम ९, ३९, ४९ (अ), ४९ (ब), ५०, ५१ अन्वये दोन आरोपींना अटक कऱण्यात आली आहे.
काल गुप्त बातमीदारामार्फत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना दोन अज्ञात इसम हस्ती दातांची ५ लाखांना विक्री करण्यास गायमुखजवळ, जुना चेक नाका येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून जुना चेक नाक्याजवळ सचिन रामचंद्र चौगुले (राहणार वडाळा) आणि प्रवीण रमेश शेरे (राहणार काजूपाडा, बोरिवली) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुर्मिळ ५०० ग्राम वजनाचा आमी ६. इंच लांबीचा हस्तीदंत पोलिसांनी हस्तगत केला. या हस्तीदंताची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत २५ लाख इतकी आहे.या हस्तीदंताचा वापर शोभेच्या वस्तू, मूर्ती आणि औषध बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हस्तीदंताची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खूप मागणी आहे.