चाकूचा धाक दाखवून लांबविला माशांचा ट्रक, जळगावच्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 11:30 PM2019-10-03T23:30:49+5:302019-10-03T23:32:47+5:30

आंध्र प्रदेशातून १२ लाख रुपये किमतीचे मासे सुरतला घेऊन जाणारा ट्रक अडवून चालक व क्लिनर यांचे अपहरण करुन हा ट्रम मास्यांसह लांबविणाऱ्याला अटक

two arrested in Jalgaon | चाकूचा धाक दाखवून लांबविला माशांचा ट्रक, जळगावच्या दोघांना अटक

चाकूचा धाक दाखवून लांबविला माशांचा ट्रक, जळगावच्या दोघांना अटक

Next

 जळगाव - आंध्र प्रदेशातून १२ लाख रुपये किमतीचे मासे सुरतला घेऊन जाणारा ट्रक अडवून चालक व क्लिनर यांचे अपहरण करुन हा ट्रम मास्यांसह लांबविणा-या शकील उर्फ महाराज शे.बाबु व रिजवान अली रजा अली खताब (दोघं रा. गेंदालाल मील, जळगाव) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. दोघांना गुरुवारी जालना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

लुटमार करणा-या या चौघांनी ट्रक चालक व क्लिनर यांना जळगावात आणले. इद्रीसच्या मेहुण्याच्या घराच्या खोलीत तब्बल तीन दिवस डांबून ठेवले. मासे विक्री झाल्यानंतर त्यांना पुन्हा टोलनाक्याच्या परिसरात सोडून देण्यात आले तर त्याच परिसरात ट्रक सोडून देण्यात आला. दरम्यान, शकील याने याआधी देखील जळगाव व एरंडोल येथून दोन वेळा ट्रक लांबवून त्याची नाशिकमध्ये विक्री केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: two arrested in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.