शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 18:42 IST

Salman Khan Salim Khan : अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकी देणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी सगळा प्रकाराबद्दल माहिती दिली. 

Salman khan Father threat News : अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना मॉर्निंग वॉक करताना एका तरुणीने धमकी दिल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी त्यांच्या सुरक्षारक्षकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्या तरुणीसह एक तरुणाला अटक केली. चौकशी वेगळाच प्रकार समोर आला. 

मुंबईतील कार्टर रोडवर सलीम खान हे रनिंग केल्यानंतर एका ठिकाणी बसले होते. त्यावेळी एक बुरखा घातलेली तरुणी आणि तरुण गाडीवरून त्यांच्याजवळ आले. तरुणी सलीम खान यांच्याजवळ गेली आणि लॉरेन्स बिष्णोईला बुलाऊ क्या?" असे म्हणाली. बुधवारी (१८ सप्टेंबर) सकाळी हा प्रकार घडला. 

सुरक्षारक्षकाने यासंदर्भात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. 

सलीम खान यांना धमकी का दिली?

दरम्यान, पोलिसांनी तरुण आणि तरुणीला अटक केली. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यात त्यांनी मस्करी करत होतो असे सांगितले. त्यामुळे दोघांनाही सलीम खान यांच्यासोबत मस्करी करणे चांगलेच महागात पडले. 

पोलीस उपायुक्त राज टिळक  रौशन यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. "दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सलीम खान यांना धमकी दिली आणि फरार झाले. दोघांना अटक करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी मस्करीत असे केले होते. यात दुसरा काही प्रकार नाही", असे ते म्हणाले. 

काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी सलमान खानच्या वांद्रे येथील घराच्या दिशेने गोळ्या झाडल्या होत्या.

टॅग्स :Salman Khanसलमान खानSalim Khanसलीम खानCrime Newsगुन्हेगारीMumbai policeमुंबई पोलीस