शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ठार मारण्याची धमकी देत बांधकाम व्यावसायिकाकडून १० लाखांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 21:22 IST

ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई: दोन वर्षांपासून सुरु होता प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : बदलापूर येथील बांधकाम व्यावसायिकासह त्याच्या परिवाराला ठार मारण्याची धमकी देत, त्याला मारहाण करुन त्याच्याकडून दहा लाख ८९ हजारांची खंडणी उकळणाऱ्या कल्पेश जाधव (२६) आणि दीपक संदनशिव (३३, रा. दोघेही बदलापूर) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने बुधवारी अटक केली. त्यांना ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

बदलापूर पूर्व भागातील प्रकाशकुमार जयस्वाल (३८) या बांधकाम व्यावसायिकाला २६ जून २०१९ ते १८ ऑक्टोंबर २०२१ या काळात बदलापूरातील मच्छी मार्केट जवळील पे अ‍ॅन्ड पार्क परिसरात तसेच इतरत्र हा प्रकार सुरु होता. कल्पेश, दीपक तसेच त्यांच्या इतर आणखी तीन ते चार साथीदारांनी आपसात संगनमत करुन जयस्वाल यांना रस्त्यात अडवून त्यांना तसेच त्यांच्या परिवाराला ठार मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करीत त्यांच्याकडून काही रोकड, सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन असा दहा लाख ८९ हजारांचा ऐवज जबरीने काढून घेतला. ही कैफियत जयस्वाल यांनी ठाणे गुन्वेषण विभागाकडे मांडल्यानंतर याप्रकरणी २ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात खंडणी उकळणे, मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला. याची गांभीर्याने दखल घेत अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी हे प्रकरण खंडणी विरोधी पथकाकडे सोपविले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे आणि सुधाकर हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पी. एस. नाळे यांच्या पथकाने ३ नोव्हेंबर रोजी कल्पेश आणि दीपक या दोघांना बदलापूरातून अटक केली. त्यांच्या इतरही साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस