शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदाराला २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 20:48 IST

लुल्लानगर येथे राहणाऱ्या २७ वर्षाच्या तरुणाने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली होती़. हा प्रकार १२ व १३ नोव्हेंबर रोजी घडला़.

ठळक मुद्देखंडणी विरोधी पथकाची कामगिरी : सुपारी देणारा निघाला मित्राचा भाऊ २५ लाख रुपये दिले नाही तर जीवे मारु अशी धमकी

पुणे : बांधकाम व्यावसायिकांना मजूर पुरविणाऱ्या ठेकेदाराला २५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून पकडले़. मनीष रमेश चावडा (वय ३४, रा़ रास्ता पेठ) आणि तेजस विकास भोर (वय २१, रा़ भोरवाडी, वडगाव, चांडिला, ता़ जुन्नर) अशी त्यांची नावे आहेत़. याप्रकरणी लुल्लानगर येथे राहणाऱ्या २७ वर्षाच्या तरुणाने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली होती़. हा प्रकार १२ व १३ नोव्हेंबर रोजी घडला़. या तरुणाबरोबर १० वषार्पूर्वी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मित्राचा मनीष चावडा हा भाऊ आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, या तरुणाचा गेल्या दहा वर्षांपासून बांधकाम व्यावसायिकांना मजूर पुरविण्याचा व्यवसाय आहे़. ते दिवाळीनिमित्त नागपूरला गेले असताना त्यांना एका मोबाईलवरुन फोन आला व त्याने तुमची रुपारी दिली आहे़. २५ लाख रुपये दिले नाही तर जीवे मारु अशी धमकी दिली़. त्यानंतर ते दोन दिवस वेगवेगळ्या मोबाईलवरुन त्यांना धमकी देणारे फोन करण्यात येत होते़ ते पुण्यात आल्यावरही हे फोन येत होते़. त्यांच्यावर पाळत ठेवली जात होती़. त्यामुळे घाबरुन त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला़ पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे या तरुणाने आपण इतके पैसे देऊ शकत नाही, असे सांगून १० लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली़. त्यानुसार १३ नोव्हेंबरला रात्री त्यांनी रस्ता पेठेतील शाहू उद्यानजवळ पैसे घेऊन येण्यास सांगितले़. त्यानुसार हा तरुण बनावट नोटांचे बंडल घेऊन तेथे पोहचला़. यावेळी पैसे घेताना तेजस भोर याला पोलिसांनी सापळा रचून पकडले़. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याला मनीष चावडा याने सुपारी दिल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी चावडा यालाही अटक केली़. मनीष चावडा याचा भाऊ संदीप चावडा हा या तरुणाबरोबर दहा वर्षांपूर्वी वडगाव येथील सिंहगड इस्टिट्युट येथे सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा शिकत होते़. त्यामुळे तो त्याला व मनीष चावडा याला ओळखत होता़. पुढील तपासासाठी दोघांना खडक पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे़. ही कामगिरी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे व त्यांचे सहकारी महेश कदम, प्रमोद मगर, धिरज भोर, मंगेश पवार, अमोल पिलाणे यांनी केली आहे़.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणPoliceपोलिसArrestअटक