शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
4
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
5
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
6
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
7
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
8
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
9
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
10
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
11
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
12
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
13
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
14
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
15
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
16
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
17
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
18
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
19
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

घरफोडी करणाऱ्या सराईत दुकलीला अटक, सुरक्षारक्षक नसलेल्या इमारतींमध्ये चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 02:41 IST

Crime News : घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कसून प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता गुन्हे घडणाऱ्या परिसरातले सीसीटीव्ही तपासले जात आहेत.

 नवी मुंबई : घरफोडी प्रकरणी वाशी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ते सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मुंबई व परिसरात ४०हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल झाली असून त्यामधील ३ लाख ७७ हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कसून प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता गुन्हे घडणाऱ्या परिसरातले सीसीटीव्ही तपासले जात आहेत. यादरम्यान १००हून अधिक ठिकाणच्या सीसीटीव्हीच्या तपासणीत वाशी पोलिसांच्या हाती माहिती लागली होती. दोन व्यक्ती कारमधून परिसरात रेकी करून रात्रीच्या वेळी घरफोडी करत असल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी रात्रीच्या वेळी सापळा रचला होता. त्याकरिता वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल, सहायक निरीक्षक सचिन ढगे, उपनिरीक्षक शशिकांत लोंढे, हवालदार शैलेंद्र कदम, संजय भाले, श्रीकांत सावंत आदींचे पथक तयार करण्यात आले होते. यावेळी शुक्रवारी रात्री दोघे जण संशयास्पद वावरताना आढळून आले. अधिक चौकशीत ते चोर असल्याचे समोर येताच त्यांना अटक करण्यात आली आहे. संजय कांबळे (४२) व सद्दाम खान (३८) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून वाशी पोलीस ठाणे हद्दीतले तीन व दादरचा एक गुन्हा उघड झाल्याचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. त्यामधील ३ लाख ७७ हजार रुपये किमतीचा चोरीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई