आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 18:35 IST2021-10-03T18:35:35+5:302021-10-03T18:35:54+5:30
IPL Betting ठाणे गुन्हे शाखेची कारवाई: तीन मोबाईल जप्त

आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या कमलेश जैस्वार (३८, रा. मुलूंड, मुंबई) आणि रत्नेश पांडे (४०, रा. मुलूंड, मुंबई) या दोन बुकींना ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने रविवारी अटक केली. त्यांच्याकडून तीन मोबाईलसह ३० हजार ६०० रुपयांची सामुग्री हस्तगत केली आहे.
ठाण्यातील माजीवडा पेट्रोल पंपाजवळ असलेल्या हॉटेल कॅपिटॉल येथील एका रूममध्ये काही बुकी क्रिकेट सामन्यावर सट्टा घेत असल्याची माहिती वागळे इस्टेट युनिटच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे यांच्या पथकाने या हॉटेलमधील एका रूमवर २ ऑक्टोंबर रोजी छापा टाकून छापा टाकून कमलेश आणि रत्नेश या दोघांना अटक केली. हे दोघेही आयपीएलच्या चेन्नई सुपर किंगज्विरुद्ध राजस्थान रॉयल्स या क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळतांना आढळले. त्यांच्याकडून तीन मोबाईल फोन आणि डायरी असा ३० हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर हे अधिक तपास करीत आहेत.