कॉलेजमधील तरुणांना ड्रग विकणारे जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 03:35 AM2019-11-25T03:35:45+5:302019-11-25T03:36:21+5:30

शाळा-महाविद्यालयांसह मॉलच्या आवारात विद्यार्थ्यांना एक्स्टसी (एमडीएमए) या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तरुणाला अमली पदार्थविरोधी पथकाने जेरबंद केले.

Two arrest who selling drugs to college youth | कॉलेजमधील तरुणांना ड्रग विकणारे जेरबंद

कॉलेजमधील तरुणांना ड्रग विकणारे जेरबंद

Next

मुंबई : शाळा-महाविद्यालयांसह मॉलच्या आवारात विद्यार्थ्यांना एक्स्टसी (एमडीएमए) या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तरुणाला अमली पदार्थविरोधी पथकाने जेरबंद केले. उत्कर्ष पतंगे (२५) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याकडून एमडीएमएच्या ९७ गोळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. एमडीएमए हे पार्टी ड्रग म्हणून ओळखले जाते.

पतंगे हा मालाडचा रहिवासी आहे. त्याच्याकडून एकूण ४ लाख ८५ हजार रुपये किमतीचा ड्रगचा साठा जप्त करण्यात आला आहे. पतंगेने पश्चिम उपनगरातील उच्चभ्रू वस्त्यांसह शाळा, महाविद्यालय, मॉल परिसरात येणाºया विद्यार्थ्यांना टार्गेट केले. त्यांना हेरून तो या पार्टी ड्रगची विक्री करत असे. याबाबत एएनसीचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांना माहिती मिळताच त्यांनी सापळा रचत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. त्याने हा साठा कुठून व कसा मिळवला याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. उत्कर्षकडून पथकाने जांभळ्या रंगाच्या गोळ्या हस्तगत केल्या आहेत. त्यावर ‘आॅडी’ असा शिक्का आहे. हा नवीनच प्रकार असून याबाबतही अधिक तपास सुरू आहे.
हे ड्रग पश्चिमेकडील देशांमध्ये होत असल्याची माहिती समोर येत आहे. तेथून चोरट्या मार्गांनी ते भारतात आणले जाते. उत्कर्षसारख्या तरुणांना हाताशी घेत त्याची सर्रासपणे विक्री होत असल्याचे समजते. याबाबत एएनसी अधिक तपास करत आहेत. त्याच्या अन्य साथीदारांचा शोधही सुरू आहे.

Web Title: Two arrest who selling drugs to college youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.