शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

HDFC बँकेत अवैधरित्या पैसे काढण्याचा प्रयत्न; तीन बँक कर्मचाऱ्यांसह 12 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 17:18 IST

Three HDFC Bank Employees Arrested : बँकेने सांगितले की, एफआयआरच्या आधारे पोलिसांनी बँक कर्मचाऱ्यांसह सर्व संशयितांना अटक केली आहे. आम्ही चौकशी पूर्ण होईपर्यंत आरोपी बँक कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

नवी दिल्ली : एचडीएफसी (HDFC) बँकेशी संबंधीत मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनिवासी भारतीयांच्या (NRI) काही बँक खात्यातून अवैधरित्या पैसे काढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तीन एचडीएफसी कर्मचाऱ्यांसह बारा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. बँकेने या प्रकरणातील आरोपी कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. (Twelve People Including Three HDFC Bank Employees Arrested For Their Involvement In Attempts To Make Unauthorized Withdrawal From A Very High Value NRI Account)

या प्रकरणात तीन एचडीएफसी कर्मचाऱ्यांसह 12 लोकांना अटक करण्यात आली आहे. या लोकांनी बँकेच्या खात्यातून अवैधरित्या ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी 66 वेळा प्रयत्न केले होते, असे दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले. 

याचबरोबर, आरोपींनी फसवणूक करून खातेदाराचे चेकबुक मिळवले होते, ते जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय, आरोपींनी खातेधारकाच्या अमेरिकेतील मोबाईल नंबरसारखा नंबरही खरेदी केला होता, असे केपीएस मल्होत्रा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बँकेने एक निवेदन जारी केले आहे. आमच्या सिस्टिममध्ये काही खात्यांवर व्यवहार करण्याचे अनधिकृत आणि संशयास्पद प्रयत्न लक्षात आले. आमच्या सिस्टिमने आम्हाला सूचित केले. यानंतर आम्ही पुढील कारवाईसाठी अंमलबजावणी यंत्रणांना कळवले आणि गुन्हा दाखल केला, असे बँकेने म्हटले आहे. 

तसेच, बँकेने सांगितले की, एफआयआरच्या आधारे पोलिसांनी बँक कर्मचाऱ्यांसह सर्व संशयितांना अटक केली आहे. आम्ही चौकशी पूर्ण होईपर्यंत आरोपी बँक कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या प्रकरणाच्या चौकशीत बँक प्रशासन पूर्ण सहकार्य करत आहे.

टॅग्स :hdfc bankएचडीएफसीcyber crimeसायबर क्राइम