शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

Tunisha sharma : शिझान खानला ४ दिवसांची पोलीस कोठडी; तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 16:22 IST

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने शूटिंग सेटवरच गळफास लावून आत्महत्या केल्याने टेलिव्हिजन क्षेत्रात खळबळ माजली आहे.

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) शूटिंग सेटवरच गळफास लावून आत्महत्या केल्याने टेलिव्हिजन क्षेत्रात खळबळ माजली आहे. काही तासांपूर्वी सीनसाठी तयार होत असतानाचा व्हिडिओ तुनिषाने  सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मग असे काय झाले की तिने इतके टोकाचे पाऊल उचलले? तुनिषाच्या आईने अभिनेता शिझान खानवर (Sheezan Khan) गंभीर आरोप केले आहे. शिझानला कंटाळून तुनिषाने आत्महत्या केल्याचा आरोप तुनिषाच्या आईने केला आहे. आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वसई कोर्टाने शिझानला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

शिझाननेच तुनिषााला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या आईने केला. शिझानला आज न्यायालयात हजर करण्यात आले. वालीव पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३०६ (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत खानविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. आरोपीला रविवारी वसई न्यायालयात पोलिसांनी हजर केल्यावर चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडे अजून पर्यंत ठोस पुरावा नसून फक्त आरोप करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास अजून बाकी असल्याची माहिती शिजानचे वकील शरद राव यांनी सांगितले आहे.  पोलिसांना अधिक तपास करायचा असल्याने शिझानला २८ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती शिझानचे वकील शरद राय यांनी दिली आहे.

Tunisha Sharma : शिझानच्या मेकअपरुममध्येच तुनिषाने केली आत्महत्या; कोण आहे शिझान खान ?

१५ दिवसांपूर्वीच झाला होता ब्रेकअप

तुनिषाच्या आईने सांगितल्याप्रमाणे १५ दिवसांपूर्वीच दोघांचा ब्रेकअप झाला होता. माझी मुलगी नैराश्यात गेली होती. शिझानमुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. शिझानचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरु झाले आणि हे तुनिषाला सहन झाले नाही. १६ डिसेंबरला तुनिषाला पॅनिक अटॅक आला होता. कारण १५ डिसेंबरला तिला शिझानविषयी कळाले होते. शिझानने माझा विश्वासघात केला असं ती सतत म्हणत होती. 

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनCrime Newsगुन्हेगारीMumbai policeमुंबई पोलीसvasai-acवसई