शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाच्या पर्सवरच मारला डल्ला; प्रसंगावधान राखून रंगेहाथ पकडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 21:20 IST

महिला पोलिस या दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास मनपा लोहगाव बसने प्रवास करत होत्या..

विमाननगर- पीएमपीएल बसमध्ये महिलांची पर्स लांबवणार्या तीन महिलांना महिला पोलिसाने प्रसंगावधान राखून पकडले. याप्रकरणी पूजा धर्मां गाज (वय २०), श्वेता राजेश गाज (वय २०) व सपना उर्फ डेविड गाज(वय २५,तिघीही.रा.सर्वोदय कॉलनी मुंढवा) यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या तिघींनी चक्क महिला पोलिसाचीच पर्स लांबवण्याचा प्रयत्न करत असताना पोलिस नाईक नलिनी सावंत यांनी त्यांना प्रसंगावधान राखून रंगेहाथ पकडले. पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार,गुरुवार( दि.१८ जुलै) रोजी महिला पोलिस नाईक नलिनी सावंत या दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास मनपा लोहगाव बसने प्रवास करत होत्या. बसमधील तीन महिला कडेवर लहान मुले घेऊन उभ्या होत्या.कडेवरील मुलाला इकडे तिकडे करत त्यांनी नाईक यांच्या पर्समध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला. याचवेळी दुसऱ्या एक महिलेच्या पर्समधील वस्तू काढल्याचे लक्षात आले. काही क्षणातच त्या बसमधून उतरण्याची घाई करू लागल्या. पोलिस नाईक नलिनी सावंत यांनी तात्काळ प्रसंगावधान राखून बसच्या दारात या तिनही महिलांना अडवून बस विश्रांतवाडी पोलिस स्टेशन येथे घेऊन आल्या. अधिक तपासात या तिनही महिलांनी पोलिस नाईक सावंत यांच्या पर्समधील रोख दोन हजार रुपये व सुनिता वाघमारे यांच्या पर्समधील रोख रक्कम व चांदिचे पैंजण असा तेरा हजार किमतीचा मुद्देमाल चोरी केल्याचे कबूल केले.चौकट - पोलिस नाईक नलिनी सावंत या सध्या पोलिस मुख्यालय येथे काम करत असून त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने पीएमपीएल बसमध्ये चोऱ्या करणाऱ्या तीन महिलांना रंगेहाथ पकडता आले. या उल्लेखनीय कामगिरी बद्दल पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड यांनी पोलिस नाईक नलिनी सावंत यांचे कौतुक व अभिनंदन केले. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप यादव करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी