बीडमधून चोरीला गेलेला बिस्किटांचा ट्रक लातुरात पकडला; तीन चोरटे ताब्यात, नाकाबंदीत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 12:36 PM2021-06-22T12:36:25+5:302021-06-22T12:40:02+5:30

बीड जिल्ह्यातील चौसाळा पाटी येथून बिस्कीट व चॉकलेटने भरलेला ट्रक चालकाला मारहाण करून चोरट्यांनी चोरून नेला.

A truck of biscuits stolen from Beed was caught in Latur; Three thieves arrested, blockade action | बीडमधून चोरीला गेलेला बिस्किटांचा ट्रक लातुरात पकडला; तीन चोरटे ताब्यात, नाकाबंदीत कारवाई

बीडमधून चोरीला गेलेला बिस्किटांचा ट्रक लातुरात पकडला; तीन चोरटे ताब्यात, नाकाबंदीत कारवाई

Next

लातूर : बीड जिल्ह्यातील चौसाळा पाटी येथून बिस्कीट व चॉकलेटने भरलेला ट्रक चालकाला मारहाण करून चोरट्यांनी चोरून नेला. दरम्यान, बार्शी रोडमार्गे हा ट्रक लातूर जिल्ह्यात येत असल्याची खबर गातेगाव पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे रामेगाव पाटी येथे नाकाबंदी करून गातेगाव पोलिसांनी हा ट्रक पकडला असून तिघा चोरट्यांनाही शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना चौसाळा पोलिसांच्या स्वाधीन केले.

सचिन शिवाजी काळे, दीपक ऊर्फ अनिल बप्पा काळे (दोघेही रा. पारा, ता. वाशी), बबन सरदार शिंदे (रा. नांदुरघाट) अशी या तिघांची नावे असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एस. नवले यांनी सांगितले. ट्रक आणि आरोपी असलेल्या तिघांना चौसाळा पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, कारवाई यशस्वी करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक नवले, पोलीस कर्मचारी मुळे, मोरे, होमगार्ड धावारे, घोणे, बनसोडे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: A truck of biscuits stolen from Beed was caught in Latur; Three thieves arrested, blockade action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.