TRP Scam :  पार्थो दासगुप्ता टीआरपी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार, मुंबई पोलिसांनी केले स्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 06:55 PM2020-12-25T18:55:28+5:302020-12-25T18:56:12+5:30

TRP scam : दासगुप्ता याला २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

TRP Scam: Partho Dasgupta TRP scam mastermind, Mumbai Police | TRP Scam :  पार्थो दासगुप्ता टीआरपी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार, मुंबई पोलिसांनी केले स्पष्ट 

TRP Scam :  पार्थो दासगुप्ता टीआरपी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार, मुंबई पोलिसांनी केले स्पष्ट 

Next
ठळक मुद्देमुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने टीआरपी घोटाळ्याप्रकरणी बार्कचा माजी सीईओ दासगुप्ता याला गुरुवारी रायगड येथून अटक केली होती.

मुंबई - ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचा (बार्क)  माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता हा टीआरपी घोटाळ्याचा (TRP Scam) मास्टरमाइंड असल्याची माहिती मुंबईपोलिसांनी दिली. दासगुप्ता याला २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  या प्रकरणातील ही १५वी अटक असून, गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक (सीआययू) अधिक तपास करत आहे.  

 

टीआरपी घोटाळाप्रकरणी बीएआरसीच्या माजी सीईओला अटक

 

मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने टीआरपी घोटाळ्याप्रकरणी (TRP Scam) बार्कचा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी दासगुप्ता याला गुरुवारी रायगड येथून बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्याला न्यायालयाने २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दासगुप्ता हाच टीआरपी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पत्रकार अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिक या वाहिनीचा टीआरपी कृत्रिमरित्या वाढवल्याच्या घोटाळ्यात दासगुप्ताचा सहभाग असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.  


हंसाच्या कर्मचाऱ्यांनाही यामध्ये अटक करण्यात आली. CIU ने बीएआरसीच्या काही अधिकाऱ्यावर लाच घेऊन काही चॅनलवर टीआरपीमध्ये घोटाळा केल्याचे आरोप आहेत. रामगढ़िया यांचे काही व्ह़ॉट्सअॅप चॅट CIU च्या हाती लागले होते. हे चॅट रामगढिया यांनी डिलीट केले होते. मात्र, फॉरेन्सिक लॅबने हे डिलिट केलेले चॅट पुन्हा मिळविले होते. 

Web Title: TRP Scam: Partho Dasgupta TRP scam mastermind, Mumbai Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.