शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

TRP Scam News: टीआरपी घोटाळ्याची व्याप्ती महाराष्ट्रासह अन्य सात राज्यांत; तपास पथके रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 2:20 AM

TRP Scam Republic TV News, आरोपी मेस्त्रीच्या खात्यात एक कोटी जमा

मुंबई : अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या ‘टीआरपी’ वाढवणाऱ्या या रॅकेटची व्याप्ती केवळ मुंबईसह महाराष्ट्रातच नव्हे, अन्य राज्यांतही पसरल्याचे अटक आरोपींच्या चौकशीत उघडकीस आले आहे. त्यानुसार, गुन्हे शाखेची पथके तपासासाठी सात राज्यांमध्ये रवाना झाली आहेत. तर, अटक आरोपी बोमपेल्ली राव मिस्त्री याच्या बँक खात्यात १ कोटी रुपये जमा झाले. दर दोन महिन्याने त्याच्या खात्यात ४ ते ५ ठिकाणांहून २० ते २५ लाख जमा होत होते.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तवार्ता विभागाचे (सीआययु) प्रमुख सचिन वाझे यांच्या पथकाने टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश करत ४ जणांना बेड्या ठोकल्या. ही चौकडी १३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठड़ीत (पान -- वर)आहेत. यात हंसा कंपनीचा विशाल भंडारी, टीआरपीसाठी पैसे पुरविण्याचे काम करणारा बोमपेल्ली राव मिस्त्रीसह फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या मालकांचा समावेश आहे.रविवारी सकाळी भंडारीसह त्याच्या मालाडच्या घरी घेण्यात आलेल्या तीन तासांच्या झडतीत एक डायरी पथकाच्या हाती लागली आहे. त्यात बॅरोमिटर आणि चॅनेल्सची नावे आणि आर्थिक व्यवहाराच्या नोंदी आहेत. प्राथमिक तपासात त्यात तीन चॅनेल्सपेक्षा अधिक चॅनल्सची नावे असून त्यानुसार ज्या लोकांना पैसे द्यायचे आहेत त्यांची नोंद आरोपी विशालने नोंद करून ठेवली आहे. विशालने त्याच्या डायरीत बॅरोमीटर बसविण्यात आलेल्या १८०० घरांचे तपशीलही नोंदवून ठेवले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार रिपब्लिक, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा चॅनेल्सच्या व्यतिरिक्त आणखी काही चॅनेल्स संशयाच्या भोवºयात आले आहेत.

तो अहवाल हंसाचा नाहीकाल रिपब्लिक चॅनेलवर एक शो ऑन एअर करण्यात आला. ज्यात हंसा नावाच्या कंपनीच्या अहवाल आहे असे सांगून त्या शोमध्ये इंडिया टुडे वर आरोप करण्यात आले. हंसाने तो अहवाल आपला नसल्याचे पोलिसांकडे स्पष्ट केले आहे.‘रिपब्लिक’चा खानचंदानी हजरमुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी चौकशीसाठी एकूण सहा जणांना समन्स बजावले होते. यात रिपब्लिक वाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विकास खानचंदानी, मुख्य ऑपरेटर अधिकारी हर्ष भंडारी, प्रिया मुखर्जी, वितरण विभागप्रमुख घनश्याम सिंग यांच्यासह हंसाच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी खानचंदानी सकाळी ९ वाजता हजर झाले. तसेच हर्ष भंडारी यांचीही चौकशी करण्यात आली.

टीव्हीवर दिसणाºया कंटेंटशी आमचे देणेघेणे नसते, त्यासाठी एडिटोरियल विभाग जबाबदार असतो, असे विकास खानचंदानी यांचे म्हणणे आहे. तर, रिपब्लिक टीव्हीचे सीएफओ शिवा सुब्रह्मण्यम सुंदरम यांनी आईच्या कोविड आजाराचे कारण देत १४ आॅक्टोबरनंतर चौकशीला हजर राहू, असे सांगितले आहे. दुसरीकडे रिपब्लिक या वृत्तवाहिनीचे हेड घनश्याम सिंह यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन वेळा समन्स बजाविले होते. मात्र, ते हजर झाले नाहीत. ते दमणच्या सॅडी रिसॉर्टमध्ये वास्तव्याला असल्याचे मोबाइल लोकेशनवरून समजताच तेथे दमण पोलिसांच्या मदतीने त्यांची सात तास चौकशी करत जबाब नोंदवण्यात आला आहे.

टॅग्स :TRP Scamटीआरपी घोटाळाMumbai policeमुंबई पोलीस