शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

TRP Scam: टीआरपी घोटाळा प्रकरण: ‘हंसा’चा आणखी एक माजी कर्मचारी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 06:50 IST

TRP Scam News: उत्तर प्रदेशातून घेतले ताब्यात; पैसे पुरविण्याचे केले काम

मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी हंसा कंपनीच्या आणखीन एका माजी कर्मचाऱ्याला उत्तर प्रदेश येथील मिर्झापूर येथून अटक करण्यात आली. विनय त्रिपाठी असे त्याचे नाव असून, याप्रकरणातील ही पाचवी अटक आहे. तो पैसे पुरविण्याचे काम करत होता. यापूर्वी हंसा कंपनीचा विशाल वेद भंडारी (२१), अंधेरीतील बोमपेली नारायण मिस्त्री (४४), बॉक्स सिनेमाचे नारायण नंदकिशोर शर्मा (४७) आणि फक्त मराठीचे शिरीष सतीश पत्तनशेट्टी (४४) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या चौकशीतून तपास पथक राजस्थान, उत्तरप्रदेशसह सात राज्यात रवाना झाले होते.

टीआरपी घोटाळात त्रिपाठी हा पाहिजे आरोपी होता. विशाल भंडारीने पथकाला दिलेल्या माहितीत, मार्च २०१९ मध्ये हंसा कंपनीत नोकरीस असताना, नोव्हेबर २०१९ मध्ये त्याला त्रिपाठीने संपर्क करून, मुंबईच्या ज्या घरामध्ये बॅरोमीटर लावलेले आहेत, अशा पाच घरांमध्ये दिवसांतून किमान दोन तास संबंधित टीव्ही चॅनल पाहण्यास उद्युक्त करण्यास सांगितले. त्याबदल्यात त्यांना दोन तासांसाठी दोनशे रुपये देण्याचे आमिष दाखवले. नोव्हेंबर २०१९ ते मे २०२० पर्यंत तो अशा प्रकारे काम करत होता. भंडारी ८३ अकाउंट मॅनेज करत होता. यातील १० अकाऊंट त्यांने पैसे देऊन मॅनेज केले होते. ज्या १० घरांना पैसे देण्यात आले होते, त्यांनी पैसे घेतल्याच मान्य केल्याचेही पोलिसांनी सांगितले.

विशालच्या डायरीमुळे अन्य चॅनेल्स रडारवरविशाल भंडारीच्या डायरीच्या आधारे पथक तपास करत आहे. यातील १८०० घरांच्या तपशिलासह अन्य एजंट, अन्य वाहिन्यापर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे.फक्त मराठी, बॉक्स सिनेमाचे बँक खाते गोठविलेटीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या फक्त मराठी, बॉक्स सिनेमासह बोमपेली राव मेस्त्रीचे बँक खाते गोठविण्यात आले आहेत. तसेच सोमवारी हंसा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपव्यवस्थापकाचा जबाब नोंदविण्यात आला असून, त्यांच्याकड़ून काही कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. लवकरच संशयाच्या भोवºयात अडकलेल्या वाहिन्यांचे फॉरेन्सिक ऑडिट होणार आहे.मुंबई पोलिसांच्या गुन्हे गुप्तवार्ता विभागाने (सीआययु) हंसा कंपनीचे सीईओ प्रवीण निझारा, उपव्यवस्थापक नितीन देवकर यांचे जबाब नोंदविले आहेत. त्यांना तपासा संबंधित काही कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले आहेत. तर रिपब्लिकचे वितरक हेड घनश्याम सिंग आणि सीईओ विकास खानचंदानी यांना साडे पाच वाजता चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. तर दुसरीकडे शिवा सुंदरम यांनी कुटुंबीयांतील आईसह तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने ते मंगळवारी मुंबईत आल्यानंतर हजर राहणार असल्याचे सांगितले. त्यांनी चौकशीला सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. तर चौकशीदरम्यान रिपब्लिकला फक्त जाहिरातीतूनच उत्पन्न मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे. तर सीआययूकड़ून वाहिन्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा विचार होत आहे. त्याबाबतचा प्रस्ताव त्यांनी सोमवारी केला असून, त्याबाबतची निविदाही जारी करण्यात आली आहे.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसTRP Scamटीआरपी घोटाळा