शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
5
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
6
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
7
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
8
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
9
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
10
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
11
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
12
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
13
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
14
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
15
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
16
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
17
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
18
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
20
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...

अनैतिक संबंधातून बायकोनं दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; कोरोनानं मृत्यू झाल्याचं सांगत अंत्यसंस्कार, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 14:26 IST

आता या प्रकरणात पोलिसांनी आरोपी भाऊ, मृतकाची बायको आणि या गुन्ह्यात सहभागी असणारे अन्य ५ साथीदारांना अटक केली आहे

ठळक मुद्देया प्रकरणात मयत व्यक्तीचा मोठा भाऊ तपनदास आणि मयताची पत्नी यांच्यात अनैतिक संबंध असल्याचं समोर आलं. हत्येनंतर भावाने गावी जाऊन मृत्यूचं कारण कोरोना असल्याचं सांगितले. त्यानंतर सर्व प्रथापरंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आलेमृतकाचा भाऊ तपनदास आणि मृतकाची पत्नी रुपाने उत्तमदासला उदयपूरला पाठवलं होतं. त्यानंतर राकेश आणि त्याच्या ४ साथीदारांना १२ लाख रुपयांची सुपारी दिली होती

राजस्थानच्या उदयपूर पोलिसांनी एक धक्कादायक गुन्ह्याचा खुलासा केला आहे. ज्यात एका महिलेने दिरासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून नवऱ्याची हत्या केली आहे. विशेष पोलीस पथकाने ५ महिन्याच्या अथक तपासानंतर हा आश्चर्यजनक खुलासा केला आहे. ही घटना उदयपूर शहराच्या प्रतापनगर परिसरात घडली आहे. ५ महिन्यापूर्वी अज्ञात मृतदेह पोलिसांना सापडला होता.

आता या प्रकरणात पोलिसांनी आरोपी भाऊ, मृतकाची बायको आणि या गुन्ह्यात सहभागी असणारे अन्य ५ साथीदारांना अटक केली आहे. एसपी डॉ. राजीव पचार यांनी पत्रकार परिषद घेत या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. पोलिसाच्या विशेष पथकातील कॉन्स्टेबल प्रल्हाद पाटीदार यांना मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक एका व्यक्तीच्या बनावट मृत्यू प्रमाणपत्र बनवत असल्याचं कळालं. यातील २ लोकांवर पोलिसांनी पाळत ठेवली. हे लोक मृत व्यक्तीचं प्रमाणपत्र बनवणार होते. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आणि चौकशी केल्यानंतर या दोघांनी इतर ३ साथीदारांसह हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला.

आरोपींना या हत्येसाठी त्रिपुरा येथील प्रदीपदास नावाच्या व्यक्तीला सुपारी दिली होती. स्पेशल टीम आणि प्रतापनगर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. या प्रकरणात मयत व्यक्तीचा मोठा भाऊ तपनदास आणि मयताची पत्नी यांच्यात अनैतिक संबंध असल्याचं समोर आलं. या हत्याकांडाचे मास्टर माईंड मयताचा भाऊ आणि पत्नीला अटक केली. सुपारी देऊन भावाची हत्या केल्याचं पोलिस तपासात कबूल केले.

हत्येनंतर भावाने गावी जाऊन मृत्यूचं कारण कोरोना असल्याचं सांगितले. त्यानंतर सर्व प्रथापरंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी मयताचा भाऊ, मयताची पत्नी यांच्यासह ५ स्थानिक गुन्हेगारांना अटक केली आहे. ज्यांनी चित्रपटाच्या कथेप्रमाणे ही हत्या घडवून आणली. माहितीनुसार मयक उत्तमदास यांची एक कंपनी होती. ज्याची वर्षाला आर्थिक उलाढाल ५ कोटींची होती. उत्तमदासने कंपनीमार्फत राजस्थान तहसील कार्यालयाच्या नुतनीकरणासाठी कंत्राट घेतलं होतं. ज्याचं काम राकेश नावाच्या आरोपींपैकी एक असलेला पाहत होता.

मृतकाचा भाऊ तपनदास आणि मृतकाची पत्नी रुपाने उत्तमदासला उदयपूरला पाठवलं होतं. त्यानंतर राकेश आणि त्याच्या ४ साथीदारांना १२ लाख रुपयांची सुपारी दिली होती. उत्तमदास उदयपूरला आल्यानंतर राकेश आणि त्याच्या साथीदारांनी दारू पाजून उत्तमची गळा दाबून हत्या केली आणि त्याचा मृतदेह उदयसागर धबधब्याकिनारी फेकला. पोलिसांनी अगोदर आरोपींना पकडलं त्यानंतर मृतकाची ओळख पटली. उत्तमदासच्या घराचा तपास केला असताना अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये हत्या केल्यानंतर त्याच्या राहत्या गावी अंत्यसंस्कार पार पडले. अनेक दिवसांपासून उत्तमचं मृत्यू प्रमाणपत्र न मिळाल्याने रुपा त्याची संपत्ती आणि अनेक योजनांपासून वंचित होती. याच कारणामुळे तिने बनावट मृत्यू प्रमाणपत्र बनवण्यासाठी प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी हाती आरोपी सापडले आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

टॅग्स :Policeपोलिस