शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अरुण गवळी, अश्विन नाईकच्या नावाने आंगाडियाकडे खंडणी मागणाऱ्या त्रिकुटाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 21:45 IST

अटक आरोपींनी अन्य व्यावसायिकांकडून देखील अशा प्रकारे खंडणी वसूल केल्याचे सांगण्यात येत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.

ठळक मुद्देआशिष हेमचंद्र मांजरेकर (४३), निलेश सुरेश दांडगे (२७) आणि कमलेश सुरेश दांडगे (२४) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.  कुख्यात गुंड अरुण गवळी आणि आश्विन  नाईक या गुंड टोळ्यांच्या मोरक्यांच्या नावाने भुलेश्वर येथील एका आंगाडियाच्या कंपनीत घुसून खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

मुंबई - शहरातील संघटित टोळ्या नेस्तनाबूत झाल्या असल्या तरी या टोळ्यांच्या म्होरक्यांच्या नावाने अद्यापही खंडणी उकळली जात असल्याचे एल. टी. मार्ग पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून उघड झाले आहे. कुख्यात गुंड अरुण गवळी आणि अश्विन  नाईक या गुंड टोळ्यांच्या मोरक्यांच्या नावाने भुलेश्वर येथील एका आंगाडियाच्या कंपनीत घुसून खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आशिष हेमचंद्र मांजरेकर (४३), निलेश सुरेश दांडगे (२७) आणि कमलेश सुरेश दांडगे (२४) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

फोफळवाडी, भुलेश्वर येथे खंजन ठक्कर यांच्या मालकीचे नवनीत अंगाडिया  आणि कुरिअर सर्व्हिस नावाची कंपनी आहे. या कंपनीचे मालक खंजन ठक्कर हे कामानिमित्त गेल्या ६ महिन्यांपासून दुबईला गेले असून त्यांच्या कार्यालयाचे कामकाज अंधेरी येथे राहणारे हर्षद दर्जी (३९)  हे पाहतात. ५  डिसेंबर रोजी ठक्कर यांचे मित्र आशिष मांजरेकर याने त्यांना फोन करून खंज न भाईसे बात करना है, असे सांगून खंजन भाईकडे जे मागितले आहे, ते न दिल्यास ऑफिस उघडून देणार नाही, असे धमकावले. त्यानंतर ४ दिवसांनी मांजरेकर, दांडगे आणि त्यांचे इतर साथीदार  पुन्हा ऑफिसमध्ये आले. त्यानंतर ऑफिस बंद करण्याबाबत शिवीगाळ करून धमक्या देऊ लागले. मात्र, दर्जी यांनी ऑफिस बंद करण्यास विरोध केला असता मांजरेकर व  त्याच्या साथीदारांनी गुलालवाडी येथील ऑफिस मध्ये काम करणाऱ्यांना धमक्या देऊन तेथील ऑफिस बंद करायला भाग पाडले. तेथून मांजरेकर व त्याचे साथीदार दर्जी यांच्या ऑफिसमध्ये आले आणि  कुख्यात गुंड अरुण गवळी, अश्विन नाईक यांच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी करू लागले.

घाबरलेल्या दर्जीने या प्रकरणी केवळ शिवीगाळ केल्याची तक्रार एल. टी. मार्ग पोलिसांत दाखल केली होती. मात्र, खंडन ठक्कर यांच्या सांगण्यावरून त्याने गवळी आणि अश्विन नाईक यांच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली. यानुसार एल. टी. मार्ग पोलिसांनी या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करून मांजरेकर निलेश दांडगे आणि कमलेश मांजरेकर या तिघांना अटक केली. तर त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

अटक आरोपींनी अन्य व्यावसायिकांकडून देखील अशा प्रकारे खंडणी वसूल केल्याचे सांगण्यात येत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. भुलेश्वर आणि परिसरात आंगाडियांची अनेक कार्यालये असून त्यांच्या कार्यालयात घुसून लूटमार करणे, खंडणीसाठी धमकावणे याचबरोबर चोरीच्या वारंवार घटना घडत असल्याने येथील आंगाडियांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

टॅग्स :ExtortionखंडणीArun Gawliअरुण गवळीArrestअटकPoliceपोलिस