अमरावती - अचलपूर तालुक्यातील धामणी गावाची रहिवासी असलेल्या आदिवासी शिक्षिकेची हिंगोलीत गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आला.शारदा मांगीलाल बेलसरे (२७) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील सोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हत्ता ते साखरा मार्गावर एका पुलाखाली पाण्यात मृतदेह आढळून आला. सदर युवतीची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. शनिवारी युवतीची ओळख पटल्यानंतर नातेवाइकांना याची माहिती देण्यात आली. वृत्त लिहिस्तोवर शनिवारी रात्री आई-वडील व परिजन हिंगोलीसाठी निघाले होते.
अचलपूरच्या आदिवासी शिक्षिकेची हिंगोलीत हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 22:34 IST