शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पाेलीस मुख्यालयात थरार; स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 20:54 IST

Suicide Attempt : वाटमारीतील संशयिताने कापला स्वत:चा गळा

ठळक मुद्देविशाल रामचंद्र  मानेकर (२४, रा. जरीपटका, नागपूर) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताचे नाव आहे.

यवतमाळ : कळंब तालुक्यातील २१ लाखांच्या वाटमारीच्या गुन्ह्यात  स्थानिक गुन्हे शाखेने संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या आराेपीने यवतमाळ पाेलीस मुख्यालयात स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना साेमवारी सायंकाळी ७ वाजता घडली. या घटनेने जिल्हा पाेलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.विशाल रामचंद्र  मानेकर (२४, रा. जरीपटका, नागपूर) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. कळंब - राळेगाव मार्गावर सावरगाव शिवारात  व्यापाऱ्याला अडवून त्याच्याकडून २१ लाखांची राेकड आराेपींनी लंपास केली. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे. या प्रकरणात त्यांनी आतापर्यंत चार संशयितांना ताब्यात घेतले. माेहदा, हिंगणघाट व नागपूर येथील संशयितांचा यात समावेश आहे. पाेलिसांनी हा गुन्हा जवळपास उघड केला आहे. मात्र, चाेरीला गेलेली राेख रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.नागपुरात कुख्यात असलेल्या विशाल याला पाेलिसांनी चाैकशीसाठी ताब्यात घेतले. त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. पाेलीस आपल्याकडून राेख रक्कम वसूल करतील, या भीतीने त्याने संधीसाधून धारदार वस्तूने स्वत:चा गळा कापून घेतला. ताे रक्ताच्या थाराेळ्यात काेसळला असल्याने पाेलिसांनाही चांगलाच धक्का बसला. त्यांनी विशालला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्या गळ्यावर टाके घालण्यात आले. त्याची प्रकृती सद्या स्थिर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. मात्र, घटनाक्रमानंतर त्याच्याभोवती पाेलीस कर्मचारीच हाेते. एवढी माेठी घटना घडूनही वरिष्ठ अधिकारी वृत्त लिहिस्ताेवर तेथे फिरकला नाही. संशयिताच्या या कृत्याने पाेलीस कर्मचारी हादरले आहेत.पाेलीस बरेचदा गुन्हा उघड करण्यासाठी आराेपींना ताब्यात  घेऊन ठेवतात, नंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर आराेपींना अटक दाखवून न्यायालयात हजर केले जाते. याशिवाय सराईत गुन्हेागार कबुली देत नाही. अशा स्थितीत वरिष्ठांनी जबाबदारी घेण्याची गरज असते. तथापि, या पक्ररणात सध्या तरी कर्मचारीच बाजू सांभाळताना दिसले.  आता या घटनेच्या चाैकशीत काय निष्पन्न हाेते, याकडे लक्ष लागले आहे.

मृतदेह ठेवले होते पलंगात लपवून; छत्तीसगडचे माजी मंत्री डी. पी. घृतलहरे यांच्या सुनेसह नातीची हत्या 

 

हि दोस्ती तुटायची नाय; मित्राने आवाज दिला नसता तर आज मी वाचलो नसतो  

वाटमारीत चार संशयित ताब्यातवाटमारीच्या गुन्ह्यात माेहदा येथे रहिवासी व यवतमाळात कृषी महाविद्यालयात शिकणाऱ्या युवकाने हा वाटमारीचा कट रचल्याचे पुढे आले आहे. मात्र, त्याला अजून आराेपी बनविण्यात आले नाही. त्याने एकतर्फी प्रेमातून युवतीच्या अंगावर फेकलेले तीन लाख पाेलिसांनी जप्त केले आहेत. याशिवाय इतर तीन आराेपींना ताब्यात घेतले आहे. हिंगणघाट येथील संशयिताने वाटमारीच्या पैशांतून वाहन खरेदी केल्याचीही चर्चा आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याYavatmalयवतमाळPoliceपोलिस