मृतदेह ठेवले होते पलंगात लपवून; छत्तीसगडचे माजी मंत्री डी. पी. घृतलहरे यांच्या सुनेसह नातीची हत्या 

By पूनम अपराज | Published: February 1, 2021 06:13 PM2021-02-01T18:13:00+5:302021-02-01T18:15:47+5:30

Double Murder : या प्रकरणी एका नातेवाइकासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

The bodies were kept hidden in a bed, Chhattisgarh's former minister D. P. Ghritalahare's granddaughter and daughter in law murdered | मृतदेह ठेवले होते पलंगात लपवून; छत्तीसगडचे माजी मंत्री डी. पी. घृतलहरे यांच्या सुनेसह नातीची हत्या 

मृतदेह ठेवले होते पलंगात लपवून; छत्तीसगडचे माजी मंत्री डी. पी. घृतलहरे यांच्या सुनेसह नातीची हत्या 

Next
ठळक मुद्देहे कुटुंब छत्तीसगडमधील खम्हारडीह भागातील सतनाम चौकात शंकर नगरमध्ये राहतं. मृत महिलेचे नाव नेहा (३०) आणि मृत ९ वर्षीय मुलीचं नाव अनन्या आहे.

रायपूर - छत्तीसगडचे माजी मंत्री डी. पी. घृतलहरे यांची सून आणि ९ वर्षाची नात यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दोघींचेही मृतदेह शनिवारी राहत्या घरात सापडले. आरोपींनी हत्या करून दोन्ही मृतदेह घरातील पलंगामध्ये लपवून ठेवले. हे कुटुंब छत्तीसगडमधील खम्हारडीह भागातील सतनाम चौकात शंकर नगरमध्ये राहतं. खम्हारडीह पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी एका नातेवाइकासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

अजूनपर्यंत या दुहेरी हत्येमागील कारण कारण उघड झालेले नाही. मृत महिलेचे नाव नेहा (३०) आणि मृत ९ वर्षीय मुलीचं नाव अनन्या आहे. नेहाच्या घरच्यांनी तिच्या पतीवर कट करुन हत्येचा आरोप केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, आई आणि मुलगी यांची हत्या शनिवारी सायंकाळी ७ ते ८ वाजल्याच्या दरम्यान झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. मृत नेहा ही तरुण घृतलहरे यांची पत्नी आहे. तरुण हा दिवंगत डी. पी. घृतलहरे यांचा मुलगा आहे. दिवंगत डी. पी. घृतलहरे हे अजित जोगी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमध्ये २००० ते २००३ पर्यंत मंत्री होते. नेहाच्या माहेरच्यांनी पोलिसांना तिचा फोन लागत नसल्याचेही सांगितले. फोन लागत नसल्याने नेहाच्या घरापासून जवळच राहणारी तिची बहिण मेघा तिची विचारपूस करायला गेली. त्यावेळी मेघाला बहिणीच्या घराचा दरवाजा बंद आढळला आणि नेहाची स्कुटी, चप्पल घराबाहेर होती. यानंतर मेघाने तातडीने तिच्या भावाला फोन केला. भाऊ आकाशने याबाबत पोलिसांना माहिती दिली. दुसरीकडे मृत नेहाच्या बहिणीने नेहाच्या घराचा दरवाजा तोडला.

"दंडाची रक्कम घेऊन कोर्टात पोहचा"; चक्क मृत व्यक्तीलाच दिली पोलिसांनी नोटीस

 

हि दोस्ती तुटायची नाय; मित्राने आवाज दिला नसता तर आज मी वाचलो नसतो  

 

घर उघडल्यानंतर घरात सर्वत्र अंधार पसरला होता. बेडरुममध्ये नेहाचा दिर डॉ आनंद राय आणि त्याचा एक सहकारी लपून बसले होते. मेघाने त्या दोघांना पकडलं आणि घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांच्या ताब्यात दिले. घरात एका खोलीत बेडवरील गादी आणि इतर सामान अस्ताव्यस्त पसरलेले होते. नेहाचे कुटुंबीय वेद राम मनहरे यांनी आरोप केला आहे की, नेहा आणि तिच्या पतीमध्ये काही दिवसांपासून भांडणाचे खटके उडत होते. नेहाच्या नवऱ्यानेच हा हत्येचा कट रचला आहे. त्याला नेहाचा दीर डॉ. आनंदने देखील मदत केली. २०१० साली दोघांनीही एकमेकांच्या पसंतीतूनच लग्न केलं. सध्या पोलीस तपास करत आहेत.

दोन्ही हत्या बुटांच्या लेसचा उपयोग करुन करण्यात आले आहेत, अशी माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. आई आणि मुलीचा गळा आवळण्यात आलेल्या दोन्ही लेस एकाच बुटाच्या आहेत. महिलेच्या डाव्या हातावर काही जखमा पोलिसांना आढळल्या आहेत. पोलिसांना घटनास्थळावर एकही पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे पोलीस सध्या लेस वापरलेल्या बुटाचा शोध घेत आहेत.

Web Title: The bodies were kept hidden in a bed, Chhattisgarh's former minister D. P. Ghritalahare's granddaughter and daughter in law murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.