नीरव मोदीच्या बंगल्यात सापडला दुर्मीळ वस्तूंचा खजिना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 03:56 PM2019-02-01T15:56:51+5:302019-02-01T16:00:29+5:30

या बंगल्यात निजाम काळातील पडदे, महागडी पेंटिंग्स आई आणि ३० लाखांची लिलावात घेतलेली लाकडी कार सापडली आहे. 

Treasure of rare items found in Nirav Modi's bungalow | नीरव मोदीच्या बंगल्यात सापडला दुर्मीळ वस्तूंचा खजिना

नीरव मोदीच्या बंगल्यात सापडला दुर्मीळ वस्तूंचा खजिना

googlenewsNext
ठळक मुद्देकारवाईदरम्यान ईडी आणि आयकर विभागाने छापा टाकून काही प्रसिद्ध चित्रकारांच्या १२५ हुन अधिक पेंटिंग्स जप्त केली आहेत. एम. एफ. हुसैन, के. के. हेब्बर, एंजोली इला मेनन, विवान सुंदरम, राजा रवि वर्मा या प्रसिद्ध चित्रकारांसह अन्य महागडी आणि दुर्मिळ पेंटिंग्ज कारवाईदरम्यान जप्त करण्यात आली आहेत. 

मुंबई - रायगड जिल्यातील अलिबाग येथील फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या बंगल्याविरोधात कारवाई करत आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बांगला जमीनदोस्त केला.मात्र, या बंगल्यात निजाम काळातील पडदे, महागडी पेंटिंग्स आई आणि ३० लाखांची लिलावात घेतलेली लाकडी कार सापडली आहे. 

कारवाईदरम्यान ईडी आणि आयकर विभागाने छापा टाकून काही प्रसिद्ध चित्रकारांच्या १२५ हुन अधिक पेंटिंग्स जप्त केली आहेत. तसेच हैद्राबादच्या निजामाशी संबंधित अंदाजे १०० वर्षापूर्वीचे जुने पडदे आणि हॉंगकॉंगमध्ये लिलावात २० लाखांना विकत घेतलेली लाकडी कारचे मॉडेल सुद्धा आढळून आले आहे. २५ जानेवारीला अलिबाग येथील किहिम बीचनजीक असलेल्या नीरव मोदीचा १०० कोटींचा बंगाला जमीनदोस्त करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरु आहे. त्यावेळी अधिकाऱ्यांना नीरव मोदींच्या बंगल्यात दुर्मिळ वस्तूंचा खजिना सापडला आहे. एम. एफ. हुसैन, के. के. हेब्बर, एंजोली इला मेनन, विवान सुंदरम, राजा रवि वर्मा या प्रसिद्ध चित्रकारांसह अन्य महागडी आणि दुर्मिळ पेंटिंग्ज कारवाईदरम्यान जप्त करण्यात आली आहेत. 

Video : अखेर फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा बंगला जमीनदोस्त 

Web Title: Treasure of rare items found in Nirav Modi's bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.