Chandigarh Crime: चंदीगडच्या सेक्टर ४१ मधील बुटेरला गावात गुरुवारी दुपारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एकाच घरात भावजय आणि तिचा दीर मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. महत्त्वाचे म्हणजे, ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा घरात दोन लहान मुले हजर होती. प्राथमिक तपासात पोलिसांनी ही सामूहिक आत्महत्या असल्याचे म्हटले आहे.
नेमकी घटना काय?
नगमा (वय २९) आणि तिचा दीर मुरसलीम (वय २४) हे सेक्टर ४१ मध्ये भाड्याने राहत होते. नगमाचा पती फरमान हा मूळचा उत्तर प्रदेशातील बिजनौरचा असून, तो एअर कंडिशनिंग मेकॅनिक म्हणून काम करतो. तो काही कामानिमित्त आपल्या गावी गेला होता.
गुरुवारी दुपारी फरमानने आपल्या पत्नीला वारंवार व्हिडिओ कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. अखेर त्याच्या चार वर्षांच्या मुलाने फोन उचलला आणि रडत सांगितले की, "चाचा खाली येत नाहीत." फोनच्या स्क्रीनवर आपल्या भावाला छताला लटकलेले पाहून फरमान हादरून गेला. त्याने तातडीने मोहालीत राहणाऱ्या आपल्या नातेवाईकाला फोन करून घरी जाण्यास सांगितले.
नातेवाईक आणि शेजारी जेव्हा घरात पोहोचले, तेव्हा त्यांना नगमा जमिनीवर मृतावस्थेत पडलेली दिसली, तर तिचा दीर मुरसलीम छताच्या हुकला मफलरच्या साहाय्याने लटकलेला होता. डीएसपी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सेक्टर ३९ च्या पोलीस पथकाने घटनास्थळाचा ताबा घेतला. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट जप्त करण्यात आलेली नाही, ज्यामुळे आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे प्रकरण हत्येचे नसून दुहेरी आत्महत्येचे वाटत आहे. मात्र, नगमाच्या गळ्यावर असलेल्या खुणांवरून पोलिसांनी एक शक्यता वर्तवली आहे. मुरसलीमने आधी आपल्या भावजयीला फाशी देऊन खाली उतरवले असावे आणि त्यानंतर स्वतः गळफास लावून घेतला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
पोरकी झालेली मुले
या दुर्घटनेवेळी घरात ३ वर्षांची मुलगी आणि ४ वर्षांचा मुलगा उपस्थित होते. आपल्या डोळ्यांसमोर आई आणि काकांना अशा अवस्थेत पाहून मुले प्रचंड घाबरली आहेत. सध्या पोलीस मृतांच्या पतीची वाट पाहत असून, तो चंदीगडला पोहोचल्यानंतर या प्रकरणाचा अधिक उलगडा होण्याची शक्यता आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सेक्टर १६ येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
Web Summary : In Chandigarh, a brother-in-law and sister-in-law were found dead in their home, with two young children present. Police suspect a double suicide, investigating if the man killed the woman before himself. The husband was away.
Web Summary : चंडीगढ़ में, एक देवर और भाभी अपने घर में मृत पाए गए, जहाँ दो छोटे बच्चे मौजूद थे। पुलिस को दोहरी आत्महत्या का संदेह है, जाँच कर रही है कि क्या आदमी ने खुद को मारने से पहले महिला को मार डाला। पति बाहर था।