शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

नवजात बालकांची तस्करी! CBI ने केला भांडाफोड; आरोपींना अटक, 8 बालकांचे रेस्क्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 13:27 IST

Delhi NCR Crime: सहा लाख रुपयांमध्ये नवजात बालकाची विक्री. एक अवघ्या 36 तासांचा, तर दुसरा 15 दिवसांचा.

CBI Human Trafficking: केंद्रीय तपास यंत्रणा, म्हणजेच CBI ने दिल्ली-एनसीआरमधील हॉस्पिटलमधून नवजात बालकांची चोरी करणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला. तपास यंत्रणेने 7 ते 8 चिमुकल्यांची सुटकाही केली आणि काही आरोपींनाही ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींचे दिल्ली-एनलीआरसह इतर राज्यातही जाळे पसरलेले आहे. सीबीआयने या संदर्भात इतर राज्यांमध्येही छापे टाकले असून, सध्या याप्रकरणी तपास सुरू आहे.

अनेक राज्यांमध्ये सर्च ऑपरेशन

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिल्लीतील केशव पुरम भागात एका घरावर छापा टाकण्यासाठी सीबीआय आणि पोलिसांचे पथक आल्याने खळबळ उडाली. दोन दिवस चाललेल्या या छाप्यानंतर सीबीआयने लहान बालकांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत 7 ते 8 नवजात बालकांची सुटका केली. धक्कादायक बाब म्हणजे, एका नवजात अर्भकाचे वय अवघे 36 तास आहे, तर दुसरा 15 दिवसांचा आहे. 

वॉर्ड बॉयसह अनेक ताब्यात सीबीआयच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान दिल्लीतील रुग्णालयात काम करणारा नीरज नावाचा वॉर्ड बॉय, इंदू नावाची महिला आणि इतर काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. काही रुग्णालयांमध्ये नवजात अर्भकांची खरेदी-विक्रीही सुरू असल्याची माहितीही सीबीआयला मिळाली आहे.

चार ते सहा लाख रुपयांना मुलांची विक्री

सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, आरोपी हे फेसबुक पेजेस आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवर जाहिरातींच्या माध्यमातून मुले दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्या अपत्यहीन जोडप्यांशी संपर्क साधायचे. आरोपींनी खऱ्या पालकांकडून, तसेच सरोगेट मातांकडून बाळे विकत घेतल्याचा आरोप आहे. या बालकांची 4 ते 6 लाख रुपयांमध्ये विक्री व्हायची. आरोपींनी बनावट दत्तक कागदपत्रे तयार करुन अनेक अपत्यहीन जोडप्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

टॅग्स :Human Traffickingमानवी तस्करीnew born babyनवजात अर्भकCrime Newsगुन्हेगारीCBIगुन्हा अन्वेषण विभाग