तक्रार मागे घेण्यासाठी फटाक्यांची माळ घरात फोडली, दोघांवर गुन्हा

By रूपेश हेळवे | Updated: October 23, 2022 15:06 IST2022-10-23T15:05:52+5:302022-10-23T15:06:10+5:30

जीवितास धोका करण्याच्या उद्देशाने घरात पेटवून धमकी दिली, अशा आशयाची फिर्याद शिवशेट्टी यांनी दिली आहे.

To withdraw the complaint, crackers were broken in the house, a crime against both | तक्रार मागे घेण्यासाठी फटाक्यांची माळ घरात फोडली, दोघांवर गुन्हा

तक्रार मागे घेण्यासाठी फटाक्यांची माळ घरात फोडली, दोघांवर गुन्हा

रुपेश हेळवे / सोलापूर

सोलापूर : केलेली तक्रार मागे घेण्यासाठी फटाक्यांची माळ घरात फोडली. याप्रकरणी दोघांवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत किरण औदुंबर शिवशेट्टी ( वय २७, रा. केगाव, उत्तर सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी किरण आणि त्यांचे बंधू घरात असताना शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आरोपी अमर विश्वनाथ बसवंती ( वय ३२), गणेश विश्वनाथ बसवंती ( वय ३४, दोघे रा. केगाव) यांनी फिर्यादीच्या घरात बळजबरीने घुसून हातातील त्यांना जीवितास धोका करण्याच्या उद्देशाने घरात पेटवून धमकी दिली, अशा आशयाची फिर्याद शिवशेट्टी यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून वरील दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस नाईक घुगे करत आहेत.

Web Title: To withdraw the complaint, crackers were broken in the house, a crime against both