शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

मामाच्या नात्याला काळीमा; लैंगिक अत्याचाराला कंटाळून एकीने संपविले जीवन तर दुसरी दहशतीखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 20:10 IST

Sexual Harasament : पाथर्डी शिवारात मामाच्या लैंगिक अत्याचाराला त्रासलेल्या पिडितेने चक्क आपली जीवनयात्राच संपविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या दोन्ही घटनांनी मामाच्या नात्याला शहरात काळीमा फासली गेली आहे.

ठळक मुद्देएकलहरेजवळील एका गावात अल्पवयीन भाचीवर तिच्या मामाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नाशिक : शहरातील वेगवेगळ्या भागात घडलेल्या दोन घटनांमध्ये एका पिडितेला सख्ख्या मामाने आपल्या वासनेचा बळी केले तर दुसऱ्या घटनेत आपल्या अल्पवयीन मुलीसोबत मामाने शेतात रात्रीच्या अंधारात लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाथर्डी शिवारात मामाच्या लैंगिक अत्याचाराला त्रासलेल्या पिडितेने चक्क आपली जीवनयात्राच संपविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या दोन्ही घटनांनी मामाच्या नात्याला शहरात काळीमा फासली गेली आहे.

एकलहरेजवळील एका गावात अल्पवयीन भाचीवर तिच्या मामाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित मामाविरुध्द पोलिसांनी बलात्कारासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आगरटाकळी येथील एक अल्पवयीन मुलगी चार दिवसांपूर्वी मामाच्या घरी गेली असता तीच्या चुलत मामाने रात्री नऊ वाजेच्या सुमारास ‘तू गावात आली मला भेटली नाही, तू माझ्या सोबत चल...’ असे म्हणत फुस लावून भाचीचा हात धरुन तोंड दाबून बळजबरीने घरामागील मळ्यातील जुन्या घरी नेले. तेथे जबरदस्ती करु लागला. भाचीने विरोध केला असता संशयिताने मारहाण करुन तिच्यावर अत्याचार केला. यानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास तिला सोबत घेत दुचाकीवरून लाखलगाव पेट्रोलपंपावर चक्कर मारून पुन्हा एकलहरेजवळील गावात आणून नव्या घरी सोडले. तेथे पुन्हा संशयित रविंद्र याने दमदाटी देत बळजबरीने मुलीवर अत्याचार करुन घराला बाहेरून कुलूप लावून जुन्या घरी गेला. अल्पवयीन भाचीच्या मोबाईलमध्ये बॅलन्स नसल्याने तीला कोणाला फोन करता आला नाही. दुस-या दिवशी सकाळी आईने फोन केल्यावर पिडित मुलीने घडलेली घटना सांगितली. मुलीची आजी-आई, मामा यांनी लागलीच रविंद्रच्या घरी येऊन दरवाजाचे कुलूप तोडून मुलीची सुटका केली. नाशिकरोडपोलिस ठाण्यात संशयित रविंद्रच्या विरुध्द बलात्कार व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पाथर्डी शिवारात एका संशयिताने इसमाने त्याच्या भाचीवर वारंवार लैंगिक अत्याचार करत बळजबरीने शरीरसंबध ठेवल्याने तिने अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून जीवनयात्रा संपविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी संशयित मामाविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार (दि२) रोजी मयत मुलीचा मामा संशयित अजय कुमार याने तिच्या भाचीला ‘तुझ्या आईची तब्येत खराब झाली असून तिला हृदयविकाराचा झटका आल्याने तिला औषध उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे’ असे खोटे सांगून कोणाच्या तरी रूमवर घेऊन जात शारीरिक संबंध ठेवले. यावेळी तिच्या भाची ने नकार दिला असता संशयिताने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर ‘तू जर माझ्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले नाही तर तुझ्या आई वडिलांना मारून टाकील’ अशी धमकी दिली होती. त्यामुळे पाथर्डी शिवारात शुक्रवार (दि७) रोजी राहत्या घरी सकाळी पिडित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे पिडित मुलीचे वडील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.स्वत:च्या भाचीसोबत शारीरिक शारीरिक संबंध ठेवण्यासाठी संशयिताकडून वारंवार बळजबरी करण्याचा प्रयत्न केला जात होता व त्याला वेळोवेळी सांगून सुद्धा ऐकत नव्हता मात्र सखा साला असल्यामुळे पोलीस ठाण्यात यापुर्वी आम्ही तक्रार दिली नव्हती असे फिर्यादीच्या वडिलांनी म्हटले आहे. संशयित आरोपीचा मोबाईल तपासला असता व्हिडिओ व मोघम स्वरूपाचे चॅटींगआधारे सदर मामा मयत भाचीला त्रास देत होता असे प्रथमदर्शनी दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणNashikनाशिकPoliceपोलिस