शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

Video : काळ आला होता पण वेळ आली नव्हती; पोलीस वृद्ध महिलेसाठी बनला देवदूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 19:28 IST

तणावग्रस्त 60 वर्षे वयाच्या महिलेला लोहमार्ग पोलीस हवालदाराने दिले जीवदान

ठळक मुद्देपोलीस हवालदार एकनाथ नाईक यांना वर्दी दिली असता जराही विलंब न करता एकनाथ  नाईक रेल्वे ट्रॅकच्या दिशेने तात्काळ धावले. 

आशिष राणे वसई - स्वतःचा जीव धोक्यात घालून ड्युटीवर असताना  तत्परतेने वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या एका पोलिस हवालदाराने समोरून लोकल ट्रेन येत असताना वसई रेल्वे ट्रॅक मध्ये जीव देण्यासाठी उभ्या असलेल्या एका 60 वर्षीय महिलेचा जीव वाचवला आहे.11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 च्या सुमारास डहाणू अंधेरी लोकल ट्रेन फलाट क्रं 5 वर येत असताना ही धक्कादायक घटना घडली आहे.

पोलीस हवालदार एकनाथ नाईक असं या जिगरबाज लोहमार्ग पोलिस हवालदारांचे नाव असून नाईक यांच्या कर्तव्य तत्परतेमुळे या महिलेला एकार्थाने जीवदान मिळाले आहे. सुभद्रा शिंदे वय 60 राहणार नालासोपारा असे या  महिलेचे नाव असून सदर महिलेची विचारपूस केली असता ती तणावाखाली असल्याचं प्रथमदर्शनी समजतेय.

या घटने प्रकरणी रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वसई रोड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रं.5 वर 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास डहाणू वरून अंधेरी येथे जाणारी जलद लोकल वसई स्थानकात येत असताना त्याच रेल्वे ब्रिजवर जीआरपी गोपनीय शाखेचे अनिल गुजर, प्रवीण थोरात आणि इतर सहकारी हे गस्त घालताना एक महिला चक्क लोकल ट्रेनच्या समोर मधोमध रेल्वे ट्रॅकमध्ये उभी आहे हे पाहून तात्काळ या दोघानी लोहमार्ग पोलीस हवालदार एकनाथ नाईक यांना वर्दी दिली असता जराही विलंब न करता एकनाथ  नाईक रेल्वे ट्रॅकच्या दिशेने तात्काळ धावले. 

सर्वप्रथम त्या मोटरमनला त्यांनी गाडी थांबवायचा इशारा दिला आणि पीडित महिलेला ट्रॅक वरून तात्काळ बाजूस काढले यामुळे नक्कीच तिचे प्राण वाचले आहेत.दरम्यान नाईक यांनी दाखवलेल्या तत्परतेचे व  प्रसंगावधान कर्तव्य निष्ठेचे सर्वत्र कौतुक होत असून वसई रोड लोहमार्ग पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी नाईक व त्यांच्या इतर सहकारी पोलिसांचे अभिनंदन करत त्यांचा हृदय सत्कार केला आहे. माझ्या सहकारी पोलीसांनी वेळीच तात्काळ माहिती दिल्यानेच मी या महिलेचे प्राण वाचवू शकलो या महिलेला जीवदान मिळाले मी धन्य झालो अशी प्रतिक्रिया एकनाथ नाईक यांनी लोकमतला दिली.

मनोरुग्ण महिलेला पाठवलं विरारच्या आश्रमात !सुभद्रा शिंदे या महिलेचे प्राण वाचवल्यावर तिची चौकशी केली असता ती तणावग्रस्त  असल्याच लक्षात आले तर विशेष म्हणजे तिच्या पतीचे कर्करोगाने पूर्वीच निधन झाल्यानंतर ती एकटीच राहत होती त्यामुळे विचारात ग्रस्त असलेल्या या महिलेने हे टोकाचे  पाऊल उचललं असावे असे पुढे आले तर तिचं मानसिक समुपदेशक केल्यानंतर तिला पोलिसांनी विरारच्या मराठा फाउंडेशन या आश्रमात पाठवले असल्याचे लोहमार्ग पोलीसांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcctvसीसीटीव्हीPoliceपोलिसVasai Virarवसई विरारrailwayरेल्वे