शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

2 मिनिटांत 100 वेळा भोसकलं, तिहारमध्ये गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची हत्या; हत्येचा CCTV समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 21:04 IST

Tillu Tajpuriya Murder: 5-6 हल्लेखोरांनी 2 मे रोजी तिहार तुरुंगात टिल्लू ताजपुरियाची निर्दयीपणे हत्या केली.

Tillu Tajpuriya Murder CCTV Footage:दिल्लीतील तिहार तुरुंगात मंगळवारी (2 मे) कुख्यात गुंड टिल्लू ताजपुरिया याची 7-8 जणांनी निर्घृण हत्या केली होती. त्याच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. ताजपुरिया याच्यावर धारदार शस्त्राने 90-100 वार केल्याची माहिती समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्येही 7-8 जण ताजपुरियावर सपासप वार करताना दिसत आहेत. हा संपूर्ण हल्ला अवघ्या दोन मिनिटांत झाला. कारागृह कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चार हल्लेखोरांना पकडले. 

कुख्यात गोगी टोळीच्या चार कथित सदस्यांनी मंगळवारी सकाळी टिल्लू ताजपुरिया याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. विशेष म्हणजे, 2021 मध्ये रोहिणी कोर्टात झालेल्या गोळीबाराच्या घटनेत ताजपुरिया आरोपी होता, ज्यामध्ये गँगस्टर जितेंद्र गोगी मारला गेला होता. तिहार तुरुंगात मंगळवारी झालेल्या ताजपुरियाच्या हत्येच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुंड ताजपुरियाची निर्घृणपणे हत्या करताना स्पष्टपणे दिसत आहे. गोगीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठीच ही हत्या झाल्याची माहिती आहे. (हत्येचा व्हिडिओ अतिशय भीषण असल्यामुळे आम्ही तो दाखवू शकणार नाहीत.)

हत्येची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होतीहल्ल्यानंतर जखमी ताजपुरिया याला दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एका वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याने सांगितले की, तळमजल्यावरील वॉर्डमध्ये बंद असलेल्या 33 वर्षीय टिल्लू ताजपुरिया याच्यावर गोगी टोळीच्या हल्लेखोरांनी सकाळी 6.15 वाजता हल्ला केला. हल्लेखोर-दीपक उर्फ ​​तीतर, योगेश उर्फ ​​टुंडा, राजेश आणि रियाझ खान हे त्याच वॉर्डातील पहिल्या मजल्यावर बंद होते.

अशी झाली हत्याहल्लेखोरांनी अतिसुरक्षा असलेल्या वॉर्डच्या पहिल्या मजल्यावरील लोखंडी सळ्या कापल्या आणि चादरीच्या सहाय्याने खाली ताजपुरियाच्या वॉर्डजवळ आले. ताजपुरियाने हल्लेखोरांना पाहिल्यानंतर तो रोहित नावाच्या दुसर्‍या कैद्याच्या सेलमध्ये धावला. रोहितने आपल्या कोठडीचा दरवाजा बंद करून ताजपुरियाला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र आतून दरवाजा बंद होऊ शकला नाही, त्यामुळे हल्लेखोर आतमध्ये घुसले आणि यावेळी रोहितही जखमी झाला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीDeathमृत्यूPoliceपोलिस