शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

टिकटॉक स्टार सोनाली फोगट हत्या प्रकरण : रोहतकमध्ये सुधीर सांगवान यांच्या कुटुंबियांची पोलिसांकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 09:59 IST

सुधीर यांची प्रॉपर्टी आणि बँक खात्याबाबतही सवाल करण्यात आले. रोहतकच्या सनसिटीमध्ये उभारलेल्या घराबाबतही चौकशी करण्यात आली. गोवा पोलिसांनी चौकशीनंतर मीडियाशी कोणतीही चर्चा केली नाही.

पणजी / रोहतक :  टिकटॉक स्टार सोनाली फोगाट हत्याकांडाच्या तपासात गोवा पोलिसांची तीन सदस्यीय टीम हरयाणाच्या रोहतकमध्ये रविवारी पोहचली. त्यांचे खासगी सहायक सुधीर सांगवान यांच्या घरी ही टीम दाखल झाली. पोलिसांनी जवळपास एक तास सुधीर यांची पत्नी आणि त्यांचे वडील यांना प्रश्न विचारले. सुधीर यांची प्रॉपर्टी आणि बँक खात्याबाबतही सवाल करण्यात आले. रोहतकच्या सनसिटीमध्ये उभारलेल्या घराबाबतही चौकशी करण्यात आली. गोवा पोलिसांनी चौकशीनंतर मीडियाशी कोणतीही चर्चा केली नाही. भाजप नेत्या व अभिनेत्री सोनाली फोगाट खून प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची मागणी त्यांचे कुटुंबीय करत आहेत. यावर ‘गोवा पोलीस सक्षम पोलीस फोर्स आहे. आम्ही हे प्रकरण तार्किक शेवटापर्यंत घेऊन जाऊ’, असे गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांचे म्हणणे आहे.प्रसार माध्यमांनी सोनाली फोगट प्रकरणात, सीबीआय चौकशीची मागणी होते त्यावर महासंचालकांची प्रतिक्रिया विचारली. त्याबद्दल महासंचालक म्हणाले की, गोवा पोलिसांचे ट्रॅक रेकॉर्ड अत्यंत चांगले आहे. खुनाच्या १०० टक्के प्रकरणांचा येथे छडा लागतो.  सध्या गोव्याची टीम हरियाणात तपास करत आहे. यावर महासंचालकांनी अधिक माहिती दिली. 

गोवा व हैदराबाद पोलिसांत जुंपली- हैदराबाद पोलिसांनी गोवा पोलिसांकडे बोट दाखवत मुख्य ड्रग्ज पेडलरला अटक करण्यात गोवा पोलीस सहकार्य करत नसल्याचा गंभीर आरोप केला होता. गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी प्रत्युत्तरादाखल हैदराबाद पोलिसांनी कधी सहकार्य मागितलेच नसल्याचे विधान केले आहे. - या विधानानंतर ड्रग्ज प्रकरणावरून गोवा आणि हैदराबाद पोलिसांमध्ये जुंपली आहे. या पेडलरचा सोनाली फाेगाट हत्येशीही संबंध असल्याचे हैदराबाद पाेलिसांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSonali Phogatसोनाली फोगाटPoliceपोलिस