शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

TikTok स्टार फन बकेट भार्गवला बलात्कारप्रकरणी अटक; अल्पवयीन मुलीवर केले लैंगिक अत्याचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 21:23 IST

Rape Case : अल्पवयीन पीडिता चार महिन्यांची गर्भवती आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी फन बकेट उर्फ चिप्पाडा भार्गव याच्याविरोधात कारवाई केली. 

ठळक मुद्देफन बकेट भार्गव याला ३ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पांढऱ्या रंगाची निसान कार आणि मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 

फन बकेट भार्गव या नावाने प्रसिद्ध असलेल्या TikTok  स्टारला बलात्कार प्रकरणात अटक झाली आहे. विशाखापट्टणममध्ये राहणाऱ्या १४ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन पीडिता चार महिन्यांची गर्भवती आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी फन बकेट उर्फ चिप्पाडा भार्गव याच्याविरोधात कारवाई केली. 

फन बकेट भार्गव याने पीडित तरुणीचे टिकटॉक व्हिडीओ पाहून तिला अनेक ऑफर दिल्या होत्या. नंतर त्याने तिला प्रपोज केले होते, मात्र तिने त्याचा प्रेमाचा प्रस्ताव नाकारला होता. मात्र तुझे आक्षेपार्ह व्हिडीओ माझ्याकडे आहेत, असं सांगून भार्गवने तिला ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केले, अशी माहिती  सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेम काजल यांनी दिली. पीडितेच्या आई वडिलांनी विशाखापट्टणममधील पेंढुर्ती पोलिस स्थानकात फन बकेट भार्गव याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. बलात्कार पीडिता चार महिन्यांची गरोदर असल्याचं समजल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.फन बकेट भार्गव याला पोलिसांनी हैदराबादमध्ये अटक केली. भार्गव हा ओ माय गॉड! ओ माय गॉड! सारख्या टिकटॉक व्हिडीओंमुळे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. फन बकेट भार्गव याला ३ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पांढऱ्या रंगाची निसान कार आणि मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणArrestअटकPoliceपोलिसTik Tok Appटिक-टॉकPregnancyप्रेग्नंसी