'टिक टॉक' वाजते डोक्यात, घर सोडणाऱ्या मुलीची पोलिसांकडून घरवापसी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 09:35 PM2019-06-03T21:35:41+5:302019-06-03T21:42:14+5:30

शिवडी कोळीवाडा परिसरात राहणारी मुलगी सध्या दहावीला आहे.

'Tik Tok' in the head, Police find out the girl who left the house | 'टिक टॉक' वाजते डोक्यात, घर सोडणाऱ्या मुलीची पोलिसांकडून घरवापसी

'टिक टॉक' वाजते डोक्यात, घर सोडणाऱ्या मुलीची पोलिसांकडून घरवापसी

Next
ठळक मुद्दे रियाजच्या कार्यक्रमासाठी ती नेपाळला जाण्यासाठी निघाली होती. आपल्या मुलीला पुन्हा घरी आणल्याबद्दल मुलीच्या कुटुंबियांनी वडाळा पोलिसांचे आभार मानले आहेत.आरपीएफ पोलिसांनी तिचा ताबा घेत तिला बालसुधारगृहात ठेवले.

मुंबई - टिक टॉक या सोशल मीडिया अ‍ॅपवर प्रसिद्ध असणाऱ्या रियाज अलीच्या प्रेमासाठी १४ वर्षीय मुलीने घर सोडले. या घर सोडलेल्या मुलीची समजूत काढून मुंबईच्या वडाळा पोलिसांनी तिची घरवापसी केली आहे. रियाजच्या कार्यक्रमासाठी ती नेपाळला जाण्यासाठी निघाली होती. आपल्या मुलीला पुन्हा घरी आणल्याबद्दल मुलीच्या कुटुंबियांनी वडाळा पोलिसांचे आभार मानले आहेत.शिवडी कोळीवाडा परिसरात राहणारी मुलगी सध्या दहावीला आहे. मुलीच्या मैत्रिणीच्या चौकशीत ती टिक टाॅकफेम रियाजची फॅन असल्याचे पुढे आले. त्याचा शो दिल्लीला होणार असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी दिल्लीला जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये शोध घेतला. तिने आईचा मोबाइल नेला होता. पोलिसांनी लोकेशन केले. यावेळी खांडवा या ठिकाणी तिचे लोकेशन दाखवले. त्यावेळी तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अश्विनी माने यांनी तिच्या मोबाइलवर फोन करत, तिच्याशी संपर्क साधला. कशी बशी माने यांनी तिची समजूत काढत तिला खांडवा स्थानकावर उतरण्यास भाग पाडले. दुसरीकडे वडाळा पोलिसांनी खांडवा येथील आरपीएफ पोलिसांशी संपर्क साधत मुलीच्या सुरक्षेबाबत आधीच सांगितले होते. आरपीएफ पोलिसांनी तिचा ताबा घेत तिला बालसुधारगृहात ठेवले. दुसऱ्या रविवारी वडाळा पोलिसांनी खांडवा येथून मुलीचा ताबा घेत सोमवारी तिच्या घरातल्यांकडे सुखरूप सूपूर्द केले.  

सोशल मिडियावरील टिक टॉक यावर प्रसिद्ध रियाजची ती फॅन आहे. दिवसभर ती आईच्या मोबाइलवर रियाजचेच व्हिडिओ पहायची. यावरून वडिलांसोबत तिचे वांरवार भांडण होत असे. यातून वडिलांसोबत तिने मागील ३ महिन्यांपासून बोलणेही बंद केले. तिच्या आईचाही मोबाइल वडिलांनी बंद केला. वडिलांचा राग मनात धरून अखेर तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. घर सोडून टिक टाॅक शोवर प्रसिद्धधी मिळवून ती रियाज, विष्णूप्रियाप्रमाणे मोठी होण्याची स्वप्न उराशी बाळगून होती. १ जूनच्या पहाटे तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान रियाजचा दिल्ली आणि नेपाळमध्ये शो असल्याची माहिती तिला तिच्या मैत्रिणीने दिली. रिजायच्या शोला जाण्यासाठी घरातून पळून जाण्यासाठी कपडे आणि घरातील ५ हजार रुपये जवळ ठेवले होते. १ जूनच्या पहाटे ४.३० वाजताच घरातील इतर मंडळी झोपेेेत असताना घराबाहेर पडली. शिवडी रेल्वे स्थानकावरून ती सीएसटीला गेली. तेथे तिने दिल्ली आणि यूपीला जाणाऱ्या एक्सप्रेसची चौकशी केली. त्यावेळी तिला सीएसटीहून एकही गाडी या राज्यात जाण्यासाठी सुटत नसून त्या गाड्या कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटतात असे सांगितले.  त्यानुसार लोकमान्य टिळक टर्मिनस  गाठत गोरखपूरला जाणाऱ्या ६.१५ वाजताच्या एक्सप्रेसला ती बसली. मुलगी कुठेही आढळून येत नसल्यामुळे घरातल्यांनी तिचा शोध सुरू केला. नंतर त्यांनी वडाळा पोलिसात मदतीसाठी धाव घेतली. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी मुलीच्या शोधकार्यासाठी ४ पथके कामाला लावली.

Web Title: 'Tik Tok' in the head, Police find out the girl who left the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.