शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांना ‘टार्गेट’ करणारा ‘तिहार रिटर्न्ड’ नीरजसिंह राठोडला पाच दिवसांची पोलिस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 13:15 IST

तो तिहार तुरुंगात कैददेखील होता व बारावी फेल असूनदेखील त्याने आमदारांना गंडविण्याचा ‘प्लॅन’ रचला.

नागपूर : अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यानंतर मंत्रिपदाचे आमिष दाखवत आमदारांना जाळ्यात ओढणारा गुजरातमधील नीरजसिंह राठोड याला गुरुवारी नागपुरात आणण्यात आले. त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या चौकशीदरम्यान पहिल्याच दिवशी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्याने सुमारे १६ आमदारांना फोनवरून संपर्क केल्याची बाब स्पष्ट झाली असून त्याच्याविरोधात अगोदरदेखील फसवणुकीचे गुन्हे दाखल होते. तो तिहार तुरुंगात कैददेखील होता व बारावी फेल असूनदेखील त्याने आमदारांना गंडविण्याचा ‘प्लॅन’ रचला.राठोड याने भाजपच्या केवळ सहाच नाही, तर १६ आमदारांना मंत्रिपदासाठी फोन केले होते. यात मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, कामठीचे आमदार टेकचंद सावरकर, हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे, जालन्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुचे, तसेच गोवा येथील आमदार प्रवीण अगलेकर आणि नागालँडचे आमदार बाशा चँग यांचा समावेश आहे. इतर आमदारांची नावे समोर येऊ शकलेली नाही. पोलिसांनी गुरुवारी त्याला नागपुरात आणल्यावर न्यायालयासमोर उभे केले. त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दिल्लीत गुन्हे दाखलचौकशीदरम्यान त्याने आमदारांना फोन लावून पैसे मागितल्याची बाब कबूल केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्याचा हा पहिलाच गुन्हा नाही. बारावी नापास असलेल्या या ठकबाजाने दिल्लीतदेखील काही जणांना फसविले होते. त्याच्याविरोधात तेथेदेखील गुन्हे दाखल झाले होते. त्याला काही काळ तिहार तुरुंगातदेखील ठेवण्यात आले होते. तेथून तो १४ जानेवारी रोजी बाहेर निघाला व त्यानंतर त्याने आमदारांना गंडविण्याचा ‘प्लॅन’ रचला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालयjailतुरुंग