शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या तोंडाला टेप लावून हातपाय बांधले तर मुलाच्या कपाळावर बंदूक रोखली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 21:38 IST

Dacoity Case : खळबळजनक घटना CCTV मध्ये कैद

आग्रा - उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात गुन्हेगारांचा कहर थांबण्याचं नाव घेत नाही आहे. सोमवारी सायंकाळी एका व्यावसायिकाच्या घरावर सशस्त्र हल्लेखोरांनी धक्कादायक घटना घडवली. चोरट्यांनी व्यावसायिकाच्या पत्नीच्या तोंडाला टेप बांधून, हात-पाय बांधून, मुलाच्या कपाळावर पिस्तुलीचा धाक दाखवून घरातून रोख रक्कम आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 12 लाखांचा ऐवज लुटून नेला. ही खळबळजनक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांची ओळख पटवली जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलानगर पोलीस ठाण्यातील भगवान नगरमध्ये सुशील अग्रवाल यांचे कुटुंबीय राहतात. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दोन सशस्त्र हल्लेखोर त्यांच्या घरात घुसले. त्यावेळी सुनील अग्रवाल यांची पत्नी घरी एकटीच होती. चोरट्यांनी सुनील अग्रवाल यांच्या पत्नीच्या तोंडाला टेप लावून तिचे हातपाय बांधले. काही वेळातच सुनील अग्रवाल यांचा मुलगा क्रिश घरी आला. चोरट्यांनी क्रिशच्या कपाळावर पिस्तूल लावून घरात ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने एका पिशवीत भरून नेले. यानंतर सुनील अग्रवाल यांची मुलगीही घरात घुसली, मात्र तिला धक्काबुक्की करून चोरटे तेथून पळून गेले.स्थानिक रहिवासी गौरव गुप्ता यांनी सांगितले की, आवाज ऐकून ते घरातून बाहेर आले, तेव्हा त्यांनी चोरट्यांना पळताना पाहिले. त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, हल्लेखोरांनी पिस्तूल काढून गोळीबार केला. लोकांनी घाबरून माघार घेतली आणि चोरटे छतावरून घटनास्थळावरून पळून गेले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांची संख्या दोन असल्याचे सांगण्यात येत आहे. 12 लाखांचा ऐवज लंपास केल्याचं घरच्यांनी सांगितला आहे.घटना cctv मध्ये कैदचोरट्यांची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गुन्हा केल्यानंतर चोरटे रस्त्यावर धावताना दिसतात. त्याचवेळी घटनेची माहिती मिळताच एसपी सिटी विकास कुमार यांनी सांगितले की, सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांची ओळख पटवली जात आहे. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. लवकरच हे चोरटे पोलिसांच्या हाती लागतील.

टॅग्स :DacoityदरोडाUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसcctvसीसीटीव्ही