उमरगा येथे तीन वर्षीय चिमुकलीचा खून ; तेरणा नदीपात्राशेजारी आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 17:32 IST2018-09-11T17:32:01+5:302018-09-11T17:32:52+5:30
तेरणा नदीपात्राशेजारी आज दुपारी एका तीन वर्षीय अनोळखी बालिकेचा मृतदेह आढळून आला आहे़

उमरगा येथे तीन वर्षीय चिमुकलीचा खून ; तेरणा नदीपात्राशेजारी आढळला मृतदेह
उमरगा (उस्मानाबाद) : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तेरणा नदीपात्राशेजारी आज दुपारी एका तीन वर्षीय अनोळखी बालिकेचा मृतदेह आढळून आला आहे़ तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण असल्याने खून झाल्याचे स्पष्ट होत आहे़
उमरगा ते लातूर जाणाऱ्या राज्यमार्गाजवळील कवठा गावाजवळ तेरणा नदीपात्राशेजारी एका बालिकेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पहिल्यांदा किल्लारी पोलिसांना मिळाली़ त्यांनी घटनास्थळी धाव घेत ही माहिती उमरगा पोलिसांना कळविली़ यानंतर उमरगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे़ मृतदेह उमरग्याच्या उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे़
दरम्यान, मयत बालिकेच्या अंगावर ठिकठिकाणी मारहाणीचे व्रण आढळून आले आहेत़ शिवाय, मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला आहे़ यावरुन त्या बालिकेचा शारीरिक अत्याचार करुन खून झाला असावा, असा संशय पोलिसांना आहे़ मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे उमरगा पोलिसांनी सांगितले़ तसेच सध्या पोलीस तिची ओळख पटविण्यासाठी प्रयत्नशील आहेत़