मोटरसायकल चोरणाऱ्या तिघांना अटक करून १० दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 19:31 IST2021-10-03T19:31:35+5:302021-10-03T19:31:45+5:30

मयूर गायकवाड यांची दुचाकी मीरारोड येथून चोरीला गेल्या प्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Three motorcycle thieves arrested, 10 bikes seized in Mira Bhayander | मोटरसायकल चोरणाऱ्या तिघांना अटक करून १० दुचाकी जप्त

मोटरसायकल चोरणाऱ्या तिघांना अटक करून १० दुचाकी जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड -  मीरा भाईंदर व इतर परिसरात दुचाकी चोरी करणार्‍या तिघांना परिमंडळ १ च्या गुन्हे शाखेने अटक करून त्यांच्याकडून चोरलेल्या १० दुचाकी जप्त केल्या आहेत.

मयूर गायकवाड यांची दुचाकी मीरारोड येथून चोरीला गेल्या प्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने काशीमीरा गुन्हे शाखे युनिटचे पोलिस निरीक्षक अविराज कुराडे व पथकाने तांत्रिक पुरावे व मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करून अयुब अली बच्चा मिया अली,  इस्माईल अस्लम साह , अलिसा दौलत हिवाळे या तिघांना अटक केली.  

त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मीरा-भाईंदर व मुंबई परिसरातून १० दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १० दुचाकी , २ मोबाईल , चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य असा ४ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हे तिघेही सराईत वाहन चोरटे असून त्यांनी काशीमीरा , नवघर , बोरिवलीच्या एम एच बी पोलिस ठाणे हद्दीत वाहन चोरीचे ७ गुन्हे  केल्याचे उघडकीस आले आहे.

Web Title: Three motorcycle thieves arrested, 10 bikes seized in Mira Bhayander