एकाच कुटुंबातील तिघांची रेल्वेखाली आत्महत्या?; तिघांचा मृत्यू तर एक चिमुकली गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 03:31 PM2020-12-19T15:31:55+5:302020-12-19T16:35:23+5:30

तिघांचा मृत्यू झाला आहे तर एक 10 वर्षाची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे.

Three members of the same family commit suicide under the train ?; Three were killed and one was seriously injured | एकाच कुटुंबातील तिघांची रेल्वेखाली आत्महत्या?; तिघांचा मृत्यू तर एक चिमुकली गंभीर जखमी

एकाच कुटुंबातील तिघांची रेल्वेखाली आत्महत्या?; तिघांचा मृत्यू तर एक चिमुकली गंभीर जखमी

Next

नालासोपारा :- विरारच्या साईनाथ नगरमध्ये राहणाऱ्या एकाच परिवारातील चौघांनी शनिवारी पहाटे नालासोपारा ते वसईच्या दरम्यान रेल्वे खाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात तिघांचा मृत्यू झाला आहे तर एक 10 वर्षाची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात भर्ती केले आहे.

वसई रेल्वे पोलिसांनी सदर प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून ही आत्महत्या तर नाही ना याचा तपास करत आहे. नंदा जंगम (55), सोमनाथ (31), प्रमिला (35) अशी मृत व्यक्तींची नावे आहे. तर 10 वर्षांची चिमुकली समीक्षा ही गंभीर जखमी आहे.


Web Title: Three members of the same family commit suicide under the train ?; Three were killed and one was seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.