शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दुधोंडीत जमावाकडून तिघांची हत्या, चौघे जखमी, आठजणांवर गुन्हे, सहाजण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 11:13 IST

Crime News: दुधोंडी (ता. पलूस) येथील वसंतनगर भागात रविवारी दुपारी एका जमावाने धारदार शस्त्राने वार करून तिघांची हत्या केली. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या घटनेत चौघे गंभीर जखमी झाले आहेत.

पलूस (जि. सांगली) : दुधोंडी (ता. पलूस) येथील वसंतनगर भागात रविवारी दुपारी एका जमावाने धारदार शस्त्राने वार करून तिघांची हत्या केली. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या घटनेत चौघे गंभीर जखमी झाले आहेत. अरविंद बाबूराव साठे (६०), सनी आत्माराम मोहिते (४०) व विकास आत्माराम मोहिते (३६) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत स्वप्निल साठे, दिलीप साठे, संग्राम मोहिते, आकाश मोहिते हे चौघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  घटनास्थळी जिल्ह्यातून पोलिसांची कुमक पाठविण्यात आली असून, या घटनेने दुधोंडी परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. चाकू, गुप्ती, काठ्यांसह अन्य धारदार शस्त्रे व दगडांचाही वापर करून हल्ला करण्यात आला. तासभर ही धुमश्चक्री सुरू होती. दुचाकी वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी प्रवीण विलास मोहिते, आदित्य विलास मोहिते, हिम्मत मधुकर मोहिते, विजय मधुकर मोहिते, किशोर प्रकाश मोहिते, वनिता विलास मोहिते, संगीता मधुकर मोहिते, मधुकर धोंडिराम मोहिते या संशयितांची नावे समोर आली आहेत. यातील सहाजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत कुंडल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी किरकोळ कारणावरून दोन गटांत वाद झाला होता. याबाबत पोलिसांत तक्रारही दाखल झाली होती. रविवारी दुपारी यातील काहीजण पोलीस ठाण्याकडे जात असताना संशयित प्रवीण मोहिते, आदित्य मोहिते, हिम्मत मोहिते, विजय मोहिते, किशोर मोहिते, वनिता मोहिते, संगीता मोहिते, मधुकर मोहिते यांनी आमच्याच लोकांना तुम्ही मारहाण करून खोटी तक्रार का दिली, अशी विचारणा करीत दुसऱ्या गटातील लोकांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. या हाणामारीत संशयितांनी धारदार शस्त्रे, लोखंडी पाइप, काठ्यांनी मारहाण केली. यात सनी मोहिते, अरविंद साठे, विकास मोहिते यांच्या छाती, पोटावर वर्मी घाव लागल्याने अतिरक्तस्राव झाला. आरोपींनी लगेच पलायन केले. सर्व जखमींना स्वप्निल साठे व त्यांच्या मित्र, नातेवाइकांनी दुचाकीवरून पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सनी मोहिते, अरविंद साठे, विकास मोहिते मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.   

पोलीस प्रमुखांकडून पाहणीपोलीसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. येथील स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांनी घटनेची माहिती घेतली. पत्रकारांशी बोलताना गेडाम म्हणाले की, यात आठ संशयितांची नावे समोर आली असून, सहाजणांना ताब्यात घेतले आहे. दोघे सध्या उपचार घेत आहेत. त्यांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली