शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

अंबिकापूर-चितोडा येथे तुंबळ हाणामारी; चाकू हल्ल्यात तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 8:26 PM

Three injured in knife attack : अंबिकापूर-चितोडा येथे शनिवारी सकाळी जुन्या वादातून तुंबळ हाणामारी झाली

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: तालु्यातील अंबिकापूर-चितोडा येथे शनिवारी सकाळी जुन्या वादातून तुंबळ हाणामारी झाली. यात दोन्ही गटाकडून शस्त्राचा वापर झाल्याने तिघे जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या घटनेच्या संतापातून गावात काही वाहने पेटविण्यात आलीत. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस घटनास्थळी दाखल झालेत. त्यानंतर आता गावात तणावपूर्ण शांतता आहे.खामगाव तालुक्यातील अंबिकापूर-चितोडा येथील हिवराळे आणि वाघ कुटुंबियांमध्ये साधारणपणे महिनाभरापासून जुना वाद सुरू आहे. शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास दोन्ही कुटुंबात पुन्हा वाद उफाळून आला. यात दोन्ही गटाकडून शस्त्राचा वापर झाल्याने तिघे जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्याला सुरूवातीला खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ झाल्याने, पुढील उपाचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले. रमेश हिवराळे (३५) असे गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव असून, यावेळी झालेल्या मारहाणीत आशाबाई गौतम हिवराळे (६१), अर्पिता कैलास हिवराळे (१८) या दोघीही जखमी झाल्यात. या घटनेनंतर गावातील काहीकाळ गावातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले.

 वाघ यांचे ट्रॅक्टर पेटविले!- तुंबळ हाणामारी, चाकू हल्ल्यानंतर सागर दिनकर वाघ यांच्या मालकीचे ट्रॅक्टर आणि मालवाहू वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर हे वाहन पेटविण्यात आले. परिणामी, चितोडा-अंबिकापूर येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी, ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार रफिक शेख घटनास्थळ दाखल झाले.

 गावात चोख पोलिस बंदोबस्त- घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गावात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दोन्ही कुटुंबामध्ये काही दिवसांपूर्वी आपसात समजोता करण्यात आला होता. मात्र, शनिवारी वादाचे पर्यवसन भांडणात झाले.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी