शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवस रेकी... नंतर प्रियकरासह पत्नीची भररस्त्यात चाकू भोसकून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 15:17 IST

Double Murder Case :हे अत्यंत हृदयद्रावक दृश्य पाहून आजूबाजूला उपस्थित लोकांचे डोळे पाणावले.

मध्य प्रदेशातील भोपाळ येथील अशोका गार्डनमध्ये दुहेरी हत्याकांड घडल्याने खळबळ उडाली आहे. येथे एका पतीने बाजारपेठेच्या मध्यभागी पत्नी आणि तिच्या प्रियकराची चाकूने हत्या केली. या घटनेदरम्यान महिलेच्या मांडीवर निष्पाप मुलगी रस्त्यावर पडली आणि हा सर्व प्रकार पाहून रडत रडत राहिली. हे अत्यंत हृदयद्रावक दृश्य पाहून आजूबाजूला उपस्थित लोकांचे डोळे पाणावले. रस्त्याने जाणाऱ्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

अशोका गार्डन पोलिस स्टेशनचे प्रभारी आलोक श्रीवास्तव यांनी आजतकला सांगितले की, कैलास नगरच्या सेमरा भागात सोमवारी रात्री एका व्यक्तीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची चाकूने भोसकून हत्या केली. मृत महिला पतीला सोडून प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मृत महिला विदिशा जिल्ह्यातील रहिवासी होती. ती आपल्या ५ वर्षांच्या मुलीसह भोपाळला आली होती आणि तिच्या साथीदारासह सेमरा भागात राहत होती. विदिशामध्ये राहणाऱ्या पतीला हे कळताच त्याने भोपाळ गाठले आणि दोघांची रेकी करायला सुरुवात केली. तीन दिवस रेस केल्यानंतर सोमवारी रात्री संधी मिळताच त्याने दुहेरी हत्याकांड घडवून आणले. दोघांचा जागीच मृत्यू झाला.

चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, पत्नीचा लिव्ह इन पार्टनर हा त्याच्या ओळखीचा होता. काही काळापासून त्याच्या पत्नीशी लिव्ह इन पार्टनर अधिक वेळ फोनवर बोलू लागला होता. याबाबत अनेकवेळा आक्षेपही घेतला, पण दोघांचेही मत जुळले नाही. सुमारे महिनाभरापूर्वी पत्नी पतीला सोडून प्रियकरासोबत राहू लागली. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने रविवारीच रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी अवजारे विक्रेत्यांकडून चाकू विकत घेतला होता. त्या मुलीवर खूप प्रेम करत असतानाही आपल्या पत्नीने मुलीलाही सोबत भोपाळला आणल्याचा त्याला खूप राग आला. आता पोलिसांनी मुलीला मृत महिलेच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसDeathमृत्यू