सोनगीरला तीन ठिकाणी घरफोडी; एक लाख २० हजारांचा ऐवज लंपास
By अतुल जोशी | Updated: October 3, 2023 17:09 IST2023-10-03T17:08:41+5:302023-10-03T17:09:01+5:30
याप्रकरणी सोनगीर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सोनगीरला तीन ठिकाणी घरफोडी; एक लाख २० हजारांचा ऐवज लंपास
धुळे : तालुक्यातील सोनगीर येथे लक्ष्मीनगर व बालाजी नगरात एकाच रात्रीतून तीन ठिकाणी घरफोडी झाली. चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण १ लाख २० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना २९ सप्टेंबरच्या रात्री ९:३० ते २ ऑक्टोबरच्या सकाळी ६:३५ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी सोनगीर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याप्रकरणी अरुण महाजन (वय ६०,रा. मेहरून, जळगाव ह. मु. सोनगीर) यांनी फिर्याद दिलेली आहे. त्यात म्हटले आहे की, लक्ष्मीनगरातील माझ्या राहत्या घरी तसेच बालाजी नगरात दोन घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले.
महाजन यांच्या घरातील कपाटातून सोन्याची मंगलपोत, व अंगठी तसेच देव्हाऱ्यातील मूर्ती चोरून नेली. चोरट्यांनी एकूण १ लाख २० हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सोनगीर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, तपास पोलिस उपनिरीक्षक रवींद्र महाले करीत आहे.