खवले मांजराची विक्री करणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 21:10 IST2020-02-08T21:08:36+5:302020-02-08T21:10:48+5:30
वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने गुप्त माहितीच्या आधारावर शनिवारी खापा वनपरिक्षेत्रात पाटणसावंगी-खापा रोडवर खवल्या मांजरची विक्री करताना तिघांना अटक केली.

खवले मांजराची विक्री करणाऱ्या तिघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (खापा) : वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने गुप्त माहितीच्या आधारावर शनिवारी खापा वनपरिक्षेत्रात पाटणसावंगी-खापा रोडवर खवल्या मांजरची विक्री करताना तिघांना अटक केली. वनविभागाच्या पथकाने तस्कराकडून बोलेरो पिकअप गाडी आणि दोन मोटार सायकल जप्त केल्या आहेत. संजय लहानुजी गजभिये, माणिक शालिकराम बेटे, मुन्ना बेटे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. विक्रीसाठी आणलेले खवले मांजर पाच फूट लांबीचे होते. वन विभागाच्या पथकाने खवले मांजर जप्त करून वैद्यकीय तपासणीसाठी नागपूर येथे ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला रवाना केले. ही कारवाई वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे निरीक्षक आदी मलाई, संदीप येवले, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, विनीत अरोरा, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण नाईक, आशिष महल्ले, समीर नेवारे यांनी केली.