वाटमारीच्या गुन्ह्यातील तिघांना एमआयडीसीमध्ये अटक; अवधूतवाडी पाेलिसांची कारावाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 16:44 IST2021-08-07T16:43:42+5:302021-08-07T16:44:03+5:30
अवधूतवाडी पाेलिसांनी गुरुवारी वाटमारीच्या गुन्ह्यातील तिघांना अटक केली.

वाटमारीच्या गुन्ह्यातील तिघांना एमआयडीसीमध्ये अटक; अवधूतवाडी पाेलिसांची कारावाई
यवतमाळ : शहरासह लगतच्या बायपासवर लुटपाट करण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. अवधूतवाडी पाेलिसांनी गुरुवारी वाटमारीच्या
गुन्ह्यातील तिघांना अटक केली. ताेच शुक्रवारी रात्री वडगाव परिसरातील एमआयडीसीमध्ये तिघांकडून लुटपाट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सुरक्षारक्षकाने तत्काळ पाेलिसांना माहिती दिल्याने तिन्ही आराेपींच्या मुसक्या आवळण्यात पाेलिसांना यश आले आहे.
अविनाश भागवान लंगाेटे (२३) रा. माेठे वडगाव, दानिश नूर खाॅ पठान (२०) रा. ईस्लामपुरा कळंब चाैक, बादल गुणवंत पेडेकर (१९) रा.
वडगाव असे अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. हे तिघेही ऑटाे घेऊन एमआयडीसी परिसरात पाेलिसांच्या हाती लागले. पाेलिसांनी
ऑटाेची झडती घेतली असता, त्यामध्ये धारदार चाकू, लहान लाेखंडी कटर, मिरचीपुडाची दाेन पाॅकिटे, दाेन लाेखंडी कटवानी अशा वस्तू
मिळून आल्या. हे आराेपी परिसरातील कंपनीवर दराेडा टाकण्याच्या प्रयत्नात हाेते. या प्रकरणी सहायक पाेलीस निरीक्षक गजानन गजभारे यांनी
दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.