धारदार तलवारींची वाहतूक करणारे तीन जण अटकेत; पाच तलवारी जप्त
By भगवान वानखेडे | Updated: August 22, 2022 14:42 IST2022-08-22T14:41:46+5:302022-08-22T14:42:00+5:30
ही कारवाई २१ ऑगस्ट रोजी शहरातील बुलडाणा-अजिंठा रोडवर करण्यात आली.

धारदार तलवारींची वाहतूक करणारे तीन जण अटकेत; पाच तलवारी जप्त
बुलडाणा : विना परवाना धारदार तलवारींची वाहतूक करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपींकडून पाच तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई २१ ऑगस्ट रोजी शहरातील बुलडाणा-अजिंठा रोडवर करण्यात आली.
२१ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात गस्त घालत असताना पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांना गुप्त माहिती मिळाली की, काहीजण ऑटोमधून धारदार तलवारींची वाहतूक करीत आहेत. या माहितीच्या आधारे बुलडाणा ते अजिंठा रोडवर नाकाबंदी केली असता ऑटो क्रमांक एमएच -२८-टी,१४६० ला अडवून झडती घेतली असता ऑटोमध्ये ३२.५ इंचीच्या पाच तलवारी आढळून आल्या. याप्रकरणी आरोपी शेख परवेज शेख शकील (२७), सैय्यद समीर सैय्यद युसूफ (३२), सैय्यद साकीब सैय्यद अलीम (२५,सर्व रा.जोहरनगर) यांना अटक केली. आरोपींकडून दोन मोबाइल आणि ऑटो असा १ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बळीराम गिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलासकुमार सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे, रामविजय राजपूत, पोलीस नाईक पंकज मेहेर, विजय वारुळे, अनंता फरताळे, सतीश जाधव, सरीता वाकोडे यांनी केली.