चेसी नंबर बदलून चोरीच्या रिक्षा विकणाऱ्या तिघांना अटक

By रूपेश हेळवे | Published: August 14, 2022 12:58 PM2022-08-14T12:58:24+5:302022-08-14T12:58:51+5:30

गुन्हे शाखेची कारवाई : ११ रिक्षा जप्त

Three arrested for selling stolen rickshaws by changing chassis number | चेसी नंबर बदलून चोरीच्या रिक्षा विकणाऱ्या तिघांना अटक

चेसी नंबर बदलून चोरीच्या रिक्षा विकणाऱ्या तिघांना अटक

googlenewsNext

सोलापूर : शहरातून रिक्षा चोरून त्यांचे चेसी नंबर बदलून विकणाऱ्या तीन जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

यातील दोन आरोपी हे विजापूर मधील मेकॅनिक असून ते गाडीचे चेसी नंबर खोडून बदलत  होते, तर सोलापूर मधील आरोपी हा त्यांना चोरीच्या गाड्या पुरवत होता. त्या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून अकरा रिक्षा जप्त केले आहे. सलीम मेहबूब साब मुल्ला, मुश्रीफ मुकबल नदाफ (दोघे रा. विजापूर), मलंग मोहम्मद बागवान (वय ३८, रा. केशवनगर मौलाली चौक, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी जीवन निरगुडे, दिलीप भालशंकर, योगेश बर्डे, वाजिद पटेल, संजय साळुंखे, वसीम शेख, अमित रावडे, विजय वाळके यांनी केली.

Web Title: Three arrested for selling stolen rickshaws by changing chassis number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.