शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

1 महिन्यात सव्वा तीन कोटींचा दंड वसूल, ठाणे वाहतूक पोलिसांकडून विक्रमी कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 14:40 IST

Thane Traffic Police : वाहतूक नियमांचे उल्लंघनाच्या ९६ हजार ८२ प्रकरणांमधिल दंड वाहनचालकांनी भरला आहे.  

ठळक मुद्देठाणे वाहतूक  पोलीसांनी १३ डिसेंबर २०२० पर्यंत सुमारे १० लाख ५० हजार वाहनचालकांना नियमभंग केल्याप्रकरणी ई चलान बजावले होते. त्यांची दंडाची रक्कम सुमारे २६ कोटी रुपये आहे.

ठाणे :  वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यां वाहनचालकांच्या विरोधात ई चलान पद्धतीने ठोठावलेल्या दंडाच्या वसूलीसाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत पहिल्याच महिन्यांत तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांच्या दंडाचा भरणा झाला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघनाच्या ९६ हजार ८२ प्रकरणांमधिल दंड वाहनचालकांनी भरला आहे.  

ठाणे वाहतूक  पोलीसांनी १३ डिसेंबर २०२० पर्यंत सुमारे १० लाख ५० हजार वाहनचालकांना नियमभंग केल्याप्रकरणी ई चलान बजावले होते. त्यांची दंडाची रक्कम सुमारे २६ कोटी रुपये आहे. अनेक  वाहनचालक ते भरण्यासाठी टाळाटाळ करत होते. वाहनचालकांमध्ये नियमांचे पालन करण्याची प्रवृत्ती वाढावी यासाठी वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी ई चलानच्या दंड वसूलीसाठी १ डिसेंबर, २०२० पासून धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत महिन्याभरात ३ कोटी २३ लाख ९४ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल झाला आहे. त्यात कार्डच्या माध्यमातून ३९ हजार १६८ प्रकरणांमध्ये १ कोटी ५२ लाख रुपयांच्या दंडाचा भरणा झाला आहे. तर, ५६ हजार ९१६ वाहनचालकांनी रोखीने १ कोटी ७१ लाख रुपयांचा भरणा केला आहे. या मोहिमेअंतर्गत होणारी कारवाई यापुढेही सुरू राहणार असून वाहन चालकांनी आपापल्या दंडाची थकीत रक्कम भरावी असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दित ठाणे वाहतूक पोलिसांचे १८ विभाग कार्यरत आहे. यापैकी नारपोली विभागाने सर्वाधिक ४० लाख ३७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्या खालोखाल कल्याण (२९ लाख १५ हजार) उल्हासनगर (२७ लाख ५९ हजार), कळवा (२६ लाख ५५ हजार) या विभागाचा क्रमांक लागतो.  आपल्या वाहनांनी कुठे, कधी आणि कशा पद्धतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे याची सविस्तर माहिती ई चलानच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. तिथेच दंडाची रक्कमही दिलेली आहे. ती भऱण्यासाठी चार वेगवेगळे पर्याय उपलब्ध असून वाहनचालकांनी त्याचा अवलंब करावा असे आवाहनही बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. 

अशा पद्धतीने भरा ई चलानचा दंड

१.    ठाणे शहर वाहतूक विभागाच्या अधिपत्याखाली ५९ अधिकारी आणि अंमलदारांकडे ई चलान मशिन आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही चलानची रक्कम रोख किंवा क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून तिथे भरता येते. 

२.    www.mahatraffic,gov.in या शासनाच्या वेबसाटवर आपल्या वाहनाचा किंवा चलान क्रमांक नोंदविल्यास प्रलंबित तडजोड शुक्ल दिसून येईल. तिथे चलान क्रमांकाची निवड करून दंडाची रक्कम भरता येते.  

३.    पेटीएम अँप मध्ये रिचार्ज आणि बिल पेमेंट या पर्यायांवर क्लिक केल्यानंतर चलान नावाचा टँब दिसतो. तिथे पुन्हा क्लिक केल्यानंतर Traffic Authority अशी विचारणा केली जाते. त्यावर महाराष्ट्र ट्राफिक पोलीस हा पर्याय निवडावा. त्यानंतर वाहन किंवा चलान क्रमांक नोंदवून दंडाची रक्कम भरता येते.   

४.    Mahatriffic App,Mum traffic App  मध्ये My Vehicle या टँबवर क्लिक करून आपल्या गाडीचे रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर My E challan मध्ये आपल्या गाडीवर किती तडजोड रक्कम बरायची आबे ते दिसेल. त्यानंतर चलानवर क्लिक करून त्या रकमेचा भरणा करता येईल.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसthaneठाणेcommissionerआयुक्त