विद्यार्थिनीला हॉस्टेलमधून काढून टाकले नाही तर फोटो व्हायरल करण्याची धमकी
By सागर दुबे | Updated: April 4, 2023 14:41 IST2023-04-04T14:41:32+5:302023-04-04T14:41:48+5:30
याप्रकरणी विद्यार्थिनीने बदनामी केली म्हणून सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

विद्यार्थिनीला हॉस्टेलमधून काढून टाकले नाही तर फोटो व्हायरल करण्याची धमकी
जळगाव : कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थिनीचा फोटो मॉर्फ करून त्याद्वारे अश्लील फोटो तयार करून हॉस्टेल इन्चार्जला पाठवून 'विद्यार्थिनीला हॉस्टेलमधून काढून टाकले नाही तर सदर फोटो व्हायरल करण्यात येईल' अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीने बदनामी केली म्हणून सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
२२ वर्षीय विद्यार्थिनी ही शहरातील एका महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सच्या तृतीय वर्षाला शिक्षण घेत असून ती महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये वास्तव्यास आहे. २२ मार्च रोजी हॉस्टेल इन्चार्ज यांच्या व्हॉटस्ॲपवर एका अनोळखी क्रमांकावरून विद्यार्थिनीचा मॉर्फद्वारे तयार केलेला अश्लील फोटो कुणीतरी पाठविला. त्यात विद्यार्थिनीबद्दल बदनामीकारक मजकूरही पाठवून जर विद्यार्थिनीला हॉस्टेलमधून काढून टाकले नाही तर सदर फोटो व्हायरल करण्यात येईल, अशी धमकी दिली होती.
हा प्रकार हॉस्टेल इन्चार्ज यांनी विद्यार्थिनींच्या कुटूंबियांना कळविला. २७ रोजी विद्यार्थिनी बाहेरगावाहून घरी आल्यानंतर कुटूंबियांनी घडलेला संपूर्ण प्रकार तिला सांगितला. फोटो पाहिल्यानंतर तो फोटो कुणीतरी मॉर्फ केला असल्याचे तिने कुटूंबियांना सांगितले. त्यानंतर सोमवारी जळगाव सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.