शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या बॉम्बने उडवून देण्याची मिळाली धमकी; सर्व प्रवेशस्थळं, प्रमुख मंदिरांवर कडक सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 20:34 IST

Threat of bomb attack in Ayodhya : अयोध्येतील सर्व प्रवेशद्वार, हॉटेल, धर्मशाळा आणि प्रमुख मंदिरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

अयोध्या - सोशल मीडियावर रामाची नगरी अयोध्या बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अयोध्येत सखोल तपासणी सुरू केली आहे. अयोध्येतील सर्व प्रवेशद्वार, हॉटेल, धर्मशाळा आणि प्रमुख मंदिरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.पोलिसांव्यतिरिक्त सीआरपीएफचे जवान आणि एटीएसचे पथक पूर्णपणे सक्रिय झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येत दहशतवादी हल्ला होण्याबाबत इनपुट मिळाल्यानंतर सतर्कता म्हणून पोलीस प्रशासनाने कारवाई केली आहे. सीओ अयोध्या आरके चतुर्वेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याच्या माहितीवरून शहरातील सर्व प्रवेशद्वारांवर सखोल तपासणी करण्यात येत आहे.

संवेदनशील मंदिरांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. संपूर्ण शहरात सीआरपीएफ आणि एटीएसची पथके सक्रिय ठेवण्यात आली आहेत. राम नगरीच्या सर्व प्रमुख ठिकाणी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. चतुर्वेदी पुढे म्हणाले की, अशा कोणत्याही धमकीबद्दल प्रशासनाकडे कोणतीही माहिती नाही, तरीही दक्षता वाढवण्यात आली आहे. त्याचवेळी अयोध्या बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याची मोठी माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अयोध्येत दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा कथित तरुण गुजरातमधील अहमदाबाद येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

टॅग्स :Bombsस्फोटकेAyodhyaअयोध्याPoliceपोलिसAnti Terrorist Squadएटीएस